देणगीदारासाठी

||श्री गुरुदेव दत्त|| ||ओम नम:शिवाय|| ||श्रीपाद राजंम् शरणंम् प्रपद्ये||

||स्वामीसमर्थ||  || श्री आदीशक्ती माता || ||ओम साईराम||

 

सन्माननीय श्री ज्ञानमाऊलीचें सांप्रत भक्तगण आणि माऊलींची हदयापासुन आत्यंतिक तळमळीने सेवा करणारे माऊलींच्या सेवेत सदैव समर्पित वारकरी…धारकरी…यांना माझा (लेखनकार) यांचा सा.न.वि.वि.

    आमचे एकच ध्येय आहे सर्व मराठी बांधवाच्या घरी सोप्या मराठी भाषेतील “ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी” ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवासम सुदंर हे. असे ज्ञानयज्ञाचे कार्य माऊलीच्या कृपेने आपणा सारख्या ज्ञानवंत आणि गुणवंताच्या संगतीत पार पडत आहे. जीवनात एवढे महान कार्य अपेक्षित नव्हतेच मुळी, ही गत जन्माची पुण्याई फळाला आली आणि सदगुरु साईच्या कृपेने ज्ञानमाऊलीची अशा प्रकारे सेवा करण्याचे भाग्य प्राप्त झाले. मुळातच अत्यंत थोरवी असलेल्या श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर महाभारतातील युध्दादरम्यान सांगितलेल्या गीतेचा संदेशच हा आहे की, कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा करु नका. किबंहुना ते कर्म करताना परीनामीचीही अपेक्षा ठेवु नका. त्यासाठी त्या विधात्यावर तो निर्णय सोडुन दे. (वो बैठा है सबसे उपर, उसको सब कुछ दिखता) (आपल्या जन्माच्या पाचव्या दिवशी सटवी मातेस पाठवुन विधात्याने, तुझा पृथ्वीतलावर तू काय करायचे आहेस ते स्पष्टपणे लिहुन ठेवले आहे, किबंहुना तीच तुझी कुंडली आहे.) आपल्या प्रत्येक कर्माबरोबर आपण केलेले कर्म त्या, त्या विहीत परीनामाने प्राप्त होत असतेच, कोणतेही कर्म फळाशिवाय नसतेच, (क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म) अशी विहीत कर्म करताना, ते कर्म करणाराची भावना त्या कर्मामागे काय होती आणि जर अपेक्षेशिवायचे कर्म असेल तर त्या उत्त्तम कर्माचे फळ भगवंताना मोक्ष रुपात दयावे लागते. म्हणुन श्रीकृष्ण भगवंतानी अपेक्षाविरहीत कर्म करा असे गीतेमध्ये अर्जुनाच्या निमीत्ताने सोप्या भाषेत सर्वासाठी (ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र असे चारी वर्ण आणि स्त्रियादि आबालवृध्द, सर्वाना) सांगितले आहे, त्या सांगण्यामागे त्यांचा कितीतरी मोठा मतितार्थ दडला आहे. आपण मराठी ज्ञानेश्वरी वाचुन गीतेचा तो संदेश मतीर्थासहीत समजुन घेण्याचा प्रयत्न करा. भगवदगीता आणि ज्ञानेश्वरीचे वाचन, मनन, चितंन आणि टायपिंग करताना त्या निम्मीत्ताने कितीतरी प्रतीचे वाचन झाले तेव्हा हे गुढ समजले.) मागील जन्माची पुण्याई आणि माझ्या गुरुदेवांच्या साईच्या कृपेने या जन्मी असा महान ज्ञानयज्ञ होत आहे. खरतर आजचे हे संगणक युग आहे, त्यामुळेच अगोदर साई प्रेरणेनुसार ज्ञानेश्वरीची वेबसाईट तयार झाली की, ज्यामुळे आपणा सर्वापर्यंत (जगाच्या कानाकोपऱयात ) सर्व दुर पोहचता आले.

    या सर्व घटनाचे अवलोकन करता सर्वच मराठी बांधवासाठी कि, ज्यांना मराठी वाचता येते, परंतु तत्कालीन भाषा आणि संस्कृत भाषा यापासुन दुर असल्याने पर्यायाने अध्यात्म आणि मोक्ष मार्गापासुन दुर आहेत, त्यांच्या साठी मराठीत एकसुत्री ज्ञानेश्वरी असावी आणि ती माझ्या करवी घरोघर पोहोचावी हा सर्वांग सुदंर योग म्हणजे यदाकदाचित ईश्वराची योजना असावी. आपणा सर्व दानशुर दात्यांकडे आता मदतीचा हात यासाठी की, याच ई-ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करता यावे यासाठी असा फक्त मराठीत भाषांतरीत एकसुत्री “ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ आपल्या घरी संग्रही असावा. तद्ववतच आठशे पानाच्या ग्रंथ प्रती करीता तेवढाच मोठा खर्च अपेक्षित आहे, आपली मदत अत्यंत मोलाची असणार आहे, म्हणजेच हे शिवधनुष्य उचलता येवु शकते. आपले आर्थिक पाठबळ मिळाल्यास आपण अल्पावधीत “ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ उपलब्ध करुन देवू. तद्ववतच या ग्रंथांची किमंतही माफक ठेवता येईल, म्हणजेच सर्वसामान्य वाचकांना हा ग्रंथ विकत घेता येईल, या पवित्र कार्यासाठी आपला हातभार लाभावा ही मनोमन इच्छा. आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना. जर त्यांच्या मनात असेल तर हे सहज शक्य होईल आपण त्यांच्या प्रेरणेनुसार पुढील वाटचाल करीत आहोत. त्यासाठीच आपणास मनापासुन विनंती. रामकृष्ण हरी !

टिप – : सर्व व्यवहार हे पारदर्शकच असतील याची आपणास ग्वाही देत आहोत, तद्ववतच याद्वारे सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यत ही ज्ञानेश्वरी पोहोचावी हीच माफक अपेक्षा आहे. कोणताही नफा मिळवावा हा हेतु नाही.

आपण खालील बॅक खात्यामध्ये आपली देणगी जमा करुन या “महाज्ञानयज्ञा”च्या कार्यात आपली मदत करुन सहभागी व्हावे. ज्यावेळी ग्रंथ छपाई होईल त्यावेळी आपणास त्यांची एक प्रत विनामुल्य आपल्या पत्त्यावर पाठविली जाईल. आणि देणगीदारांची नावे त्या ग्रंथात छापली जातील.

१) Bank of Maharashtra

Prasad Narayan Deorukhakar

Account No – 60211979769  IFSC Code – MAHB0001836

२) Axis Bank

Narayan Vitthal Deorukhakar

Account No – 912010022383849 IFSC Code – UTIB0000386

3) Paytm –    7773932857

4) phonepe –  7773932857

5) paypal –    [email protected]

Contact number What’s up- 7773932857.