अध्याय ११ भाग १

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय –  ११

विश्वरुपदर्शन  योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय११ मधीलविश्वरुपदर्शन योगया अध्यायातील ते ५५ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ७०८ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

आता यानंतर अकराव्या अध्यायामध्ये शांत आणि अदभुत अशा दोन रसांनी परिपुर्ण अशी कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरुपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसांच्या घरी  अदभुत रस हा पाहुणा म्हणुन आला आहे आणि त्यांच्या पंक्तीत बसलेल्या इतर रसांचा वीर, रौद्र आणि करुण रस यांचाही यथायोग्य मानसन्मान झाला आहे. लग्नामध्ये वधुवरांचे बरोबर इतर वऱ्हाडी मंडळीचा वस्त्र, अलंकार याचा आहेर करुन जसा मान दिला जातो, त्याप्रमाणे शांत आणि अदभुत हे दोन रस डोळयांच्या ओजंळीत घ्यावेत, इतक्या स्पष्ट स्वरुपात प्रगट झाले आहेत जणु काही विष्णू आणि शंकर प्रेमभावाने आलिंगन देण्यासाठी यावेत. किवां अमावस्येच्या दिवशी सुर्य आणि चंद्र दोन्ही बिंबें समान स्वरुपात परस्परांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात शांत आणि अद् भुत अशा दोन रसांचे ऐक्य झाले आहे, ज्याप्रमाणे प्रयाग तीर्थक्षेत्रात गंगा व यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे हा अध्याय प्रयागक्षेत्र झाला आहे, म्हणुन जगातील लोक या संगमात स्नान करुन पवित्र होतात,

        या अध्यायात गीता सरस्वती गुप्त आहे आणि शांत व अदभुत अशा दोन रसांचे ओघ मूर्त  स्वरुपात आहेत,  म्हणुन श्रोते हो ! ही अलौकिक त्रिवेणी अनायसे आपणा सर्वानां प्राप्त  झाली आहे, माझ्या आत्मज्ञान देणाऱ्या सदगुरुंनी या त्रिवेणी तीर्थामध्ये श्रवणाच्या द्वारे प्रवेश करणे सोपे केले आहे, या गीतारुपी तीर्थाचे संस्कृत भाषारुपतीर गाठणे सर्वसामान्याना सहज शक्य नसल्यामुळे या ठिकाणी श्री ज्ञानरायांनी मराठी भाषारुपी पायऱ्यांचे घाट परमगुरू  श्री निवृत्तीनाथांच्या कृपार्शिवादाने बांधले, आणि  सर्वसामान्याना अध्यात्माची वाट सोपी करुन दिली. म्हणुन कोणीही त्या तीर्थामध्ये परमभक्तीने मंगल स्नान करावे आणि ज्याप्रमाणे प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये माधवांचे दर्शन होते त्याप्रमाणे येथे परमेश्वरांच्या विश्वरुपाचे  दर्शन घ्यावे आणि जन्म-मरणरुपी संसाराला तिलांजली द्यावी. ( ओवी १ ते १०)

            हे वर्णन पुरे, सांराश याप्रमाणे येथे नवरस मुर्तिमतं बहरास आहे आहेत, आणि जगाला श्रवणसुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. या  अध्यायामध्ये शांत आणि अदभुत असे दोन रस प्रत्यक्षपणे प्रगटले आहेत, तसेच इतर रसांनाही यथायोग्य मान मिळाला आहे. एवढे या अध्यायाचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मुर्तिमतं कैवल्य आहे, तो हा अकरावा अध्याय विश्रांतीचे स्थान आहे आणि अर्जुन हा सदभाग्याचा राजा असल्यामुळे अशा ठिकाणी येवुन पोचला आहे, या ठिकाणी अर्जुनाला एकटयाला सदभाग्य प्राप्त झाले आहे याकरिता माझी प्रेमाची विनंती ऐका, तुम्ही सज्जनांनी गीतेच्या अर्थाकडे लक्ष द्यावे, तुम्हा संत-सज्जनांच्या सभेमध्ये मला अशी सलगी करणे योग्य वाटत नाही परंतु तुम्ही प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मला मानावे पोपटाला  आपण बोलायला शिकवतो आणि तो पोपट बोलु लागला की आपणच मान डोलावावयाची असते अथवा आई आपल्या बालकाकडुन काही लीला करवुन घेते पण त्या लीला पाहुन आपण संतुष्ट होत नाही का? त्याप्रमाणे महाराज , माझ्या मुखातुन जे प्रगटले ते आपणच शिकवलेले आहे म्हणुन देवा !  आपले बोलणे आपणच एकाग्रतेंने श्रवण करावे, हे अमृतमधुर शब्दब्रम्हाचे झाड तुम्हीच लावाले आहे तरी महाराज अवधानरुपी अमृताचे  सिचंन करावे आणि ते झाड मोठे करावे. मग हे शब्दाब्रम्हाचे झाड रसभाव यांच्या फुलांनी फुलेल, नाना प्रकारच्या अर्थरुपी फळभाराने फळाला येईल तुमच्या या धर्ममय कृतीने सर्व जगात सुखाची प्राप्ती होईल.  ( ओवी ११ ते २०)

          या माझ्या बोलण्याने संत-सज्जन श्रोते आनंदात रंगुन गेले आणि म्हणाले, आम्हाला समाधान प्राप्त झाले तू गीतार्थ प्रगट केलास हे फार उत्तम  केलेस आता अर्जुन काय बोलला हे आपण सांगावे. तेव्हा  सदगुरू निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले त्या गीतेमध्ये या श्रीकृष्ण-अर्जुनाचा जो सुखसंवाद आहे त्याचा अर्थ मी कसा बरे सांगू शकेन ? वरंतु तुम्ही कृपा करावी आणि माझ्या हदयातुन तो अर्थ प्रगट करवावा, रानातील पाने, फळे खाणाऱ्या वानरांकडून लंकेश्वर रावणाचा पराभव प्रभू श्री रामचंद्राने केला अर्जुनाने स्वताच्या एकटयाच्या सामर्थ्यावर दुर्योधनाची अकरा अक्षौहणी सेना जिंकली नाही काय? म्हणुन समर्थ जे जे करतात ते ते या चराचरात होणार नाही असे नाही म्हणून तुम्ही संत-सज्जनांनीच माझ्याकडुन गीतेचा अर्थ प्रगट करवुन घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो, आता प्रत्यक्ष वैकुंठाचा जो राजा त्याच्या मुखातुन प्रगटलेल्या गीतेचा परिशुध्द अभिप्रेत अर्थ मी सांगणार आहे तरी इकडे लक्ष द्यावे, हा गीता ग्रंथराज खरोखर धन्य धन्य आहे की वेदांमध्ये प्रतिपादनाचा विषय म्हणुन जो देव आहे तो श्रीकृष्णच या ग्रंथाचा वक्ता झाला आहे. त्या महान गीताग्रंथाचा गौरव कोणत्या शब्दाने करावा? जो गीताग्रंथ शंकरांच्या बुध्दीलाही आमलन होत नाही त्या गीताग्रंथाला जिवाभावाने नमस्कार करावा हेच उत्तम.मग त्या अर्जुनाने विश्वरुप पाहण्याची इच्छा मनामध्ये ठेवुन प्रारंभी तो कसे बोलला हे ऐका,हे संपूर्ण विश्व परमात्मस्वरुप आहे असा जो शब्दाने होणारा बोध आहे तो प्रत्यक्ष डोळयांचाही विषय व्हावा, ही खरी माझ्या अंतरंगाची इच्छा आहे परंतु देवाला हे सांगताना खरोखर हे संकट वाटत आहे कारण गुढ  असे विश्वरुप देवाला कसे बरे विचारावे?  (ओवी २१ ते ३०)

            यापुर्वी देवाला कोणत्याही भक्ताने विचारले नाही, ते आपण धाडसाने ” विश्वरुप दाखवा ” असे कसे बरे म्हणावे? माझी जरी देवाशी  चांगली सलगीअसली तरी लक्ष्मीमातेपेक्षा मी जवळचा आहे काय? परंतु लक्ष्मीमाता देखील हा प्रश्न विचारण्यास भिती वाटली, माझी कितीही सेवा झाली असली तरी गरुडाच्या एवढी सेवा झाली काय? परंतु  गरुड देखील विश्वरुपासंबंधी भाषाच करत नाही. मी खरोखरच सनकादिकांपेक्षा जवळचा आहे काय? पण त्यांनाही विश्वरुप दाखवावे असा आग्रह धरता आला नाही, गोकुळातील प्रेमळ भक्तांसारखा मी श्रीकृष्णाला आवडतो काय? गोकुळातील लोकांना देखील आपण सर्वसामान्य बालक आहोत अशा भ्रमाने श्रीकृष्णाने ठकविले. अंबरीषासारख्या थोर राजाकरिता दहा वेळा गर्भवास भोगला, परंतु आपले विश्वरुप हे कोणाला दाखविले नाही ते गुप्त ठेवले. इतकी ही गुहय गोष्ट  श्रीकृष्णाच्या अंतर्यामातील अत्यंत महत्वाची आहे तेव्हा मला या विश्वरुपासंबंधी एकदम कसे बरे विचारता येईल? विश्वरुपासंबंधी काही विचारु नये असे जरी मी ठरविले तरी विश्वरुप पाहिल्याशिवाय मला खरे सुख प्राप्त होणार नाही इतकेच नव्हे तर भगवंताचे विश्वरुप दर्शन पाहिल्या शिवाय मी जिवंत राहीन की नाही हा संशय मला वाटू लागला आहे.  मग आता शांतपणे देवाला विचारुन त्यांच्या इच्छेप्रमाणे करु अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलण्यास प्रवृत्त झाला. तो अशा प्रेमभावनेने नम्र भावनेने बोलू लागला की एक-दोन वाक्ये बोलल्याबरोबरच श्रीकृष्ण हे झाडा देवुन संपुर्ण विश्वरुप दाखवतील अहो, वासरु पाहिल्याबरोबर गायही मोहाने खडबडुन उठते मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व वासराच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा फुटणार नाही का?  (ओवी ३१ ते ४०)

         असे पाहा की ज्या पांडवांचे संरक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण रानावरामध्ये धावले त्या श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारावे तेव्हा तो विचारणे हे देखील सहन करील काय? श्रीकृष्ण  हे तर मुर्तिमंत स्नेहच आहेत आणि अर्जुन त्या प्रेमात घातलेले खाद्य आहे. अशा प्रकारे दोघांच्या संगमामध्ये भेद उरला, हेच विशेष आहे, म्हणुन अर्जुनाने तशी प्रार्थना केल्याबरोबर देव आपोआपच विशाल असे विश्वरुप धारण करील असा या अध्यायातील पहिला प्रसंग आहे. तरी तो श्रोत्यांनी एकाग्रतेने श्रवण करा मग अर्जुन देवांस म्हणाला, हे कृपासागरा, जे शब्दाने बोलता येण्यासारखे नाही ते शब्दांच्या पलीकडील गुहय तुम्ही माझ्यासाठी बोलुन दाखविले, जेव्हा पंचमहाभुते ब्रम्हतत्वामध्ये लीन होतात व जीव आणि महदतत्व हे लय पावतात, त्यावेळी परमात्मा जे रुप धारण करुन राहतात ते शेवटचे आणि सर्वाचे विश्रांतिस्थान आहे, जे तुम्ही हदयाच्या गाभाऱ्यात कृपणासारखे पुरून ठेवले असुन वेदांपासूनही चोरुन ठेवले  होते ते तुम्ही आज आपले हदय उघडे करुन दाखविले. ज्या अध्यात्मज्ञानासाठी देवाधिदेव भगवान शिवशंकरांनी ऐश्वर्य सोडुन स्मशानात निवास केला. हे स्वामी, ते अध्यात्मज्ञान तुम्ही मला उघडे करुन दिले, असे बोलावे तर आम्ही तुझ्यापासुन वेगळे आहोत तरी कुठे? पण खरोखर मोहाच्या महापुरामध्ये मी डोक्यापर्यत बुडालो आहे हे पाहुन तु स्वताच त्या महापुरात उडी टाकुन मला वर काढलेस, एकटया तुझ्यावाचुन संपुर्ण विश्वामध्ये दुसऱ्या कोणत्याही अस्तित्वाची भाषाच संभवत नाही. परंतु आमचे दुर्दैव पहा की अहंकाराने आम्ही कोणी तरी आहोत असे समजतो. (ओवी ४१ ते ५०)

         जगात मीच एक अर्जुन आहे, असा देहाच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला होता तसेच कौरवांना आपले भाऊबंद म्हणत होतो, याही पेक्षा मला असे वाटत होते की युध्दात यांना मी मारीन आणि स्वजनांचा वध केल्यामुळे मला नरकात जावे लागेल, असे दु: स्वप्न मी पाहत होतो,तेव्हाच प्रभूंनीच मला जागृत केले, हे देवा ! मी आता गंर्धवनगरी सोडुन बाहेर पडलो आहे इतके दिवस मी जलाच्या इच्छेने मृगजळ प्राशान करीत होतो. महाराज ! सर्प जरी कापडाचा होता पण त्याच्यावर पाय पडुन तो चावला, या भ्रमाने विषाच्या लहरी मात्र खऱ्या होत्या, या प्रमाणे आपण मृत्यू पावतो, अशा भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला जगविण्याचे श्रेय तु घेतलेस. विहिरीतील पाण्यामध्ये आपलेच प्रतिबिबं पडले आहे हे न कळल्यामुळे सिहं पाण्यात उडी टाकणार एवढयात त्याला कोणीतरी येवुन धरावे, त्याचप्रमाणे हे अनंता ! आपण माझे अशा प्रकारच्या भ्रमापासुन संरक्षण केलेत. एरवी युध्दाबद्दल माझा तर इतका दृढनिश्चय झाला होता की आत्ताच सात सागरांनी एकत्र मिळावे आणि हे संपुर्ण जग बुडुन जावे, त्यानंतर आकाशसुध्दा खाली पडावे एवढा मोठा अनर्थ झाला  तरी चालेल परंतु सगोत्रा बरोबर युध्द करण्याचा प्रसंग माझ्यावर येवु नये, असा अहंकार वाढल्यामुळे दुराग्रहरुपी पाण्यामध्ये मी बुडी मारली होती, परंतु  तु जवळ होतास, हे फार चांगले झाले नाहीतर मला कोणी बाहेर काढले असते? वास्तविक मी कुणीही नसताना आहे असे मानल आणि नाहीत त्यांना नाव-गोत्र खोटेच ठेवले भ्रमामुळे मी तर वेडापिसा झालो होतो, परंतु त्यापासुन तुम्ही माझे रक्षण केलेत, पुर्वी लाक्षागृहात अग्नीमध्ये सापडलो असता त्या वेळी अग्नीची भीती स्थुल देहाला होती पण आताची ही दुसरी मोहरुपी अग्नीची पीडा चैतन्यरुपी देहाला होती.(ओवी ५१ ते ६०)

पुढील भाग