हरीपाठ-भाग-२

 भाषातंरकार आणि लेखक साईभक्त – नारायण विठ्ठल देवरुखकर.

 

अभंग –१

जो भक्त भगवंताच्या द्वारात,देवाच्या मंदिरात भक्तीपुर्वक सात्विक भावाने जातो. काही क्षण म्हणजेच ईश्वराच्या प्रागंणात त्याला वेळ शक्य असेल तेव्हा शांतपणे  तास, अर्धा तास  आराध्य देवांची भक्ती करतो. आपल्या आयुष्यातील काही काळ अशाप्रकारे आपल्या इष्ट दैवतांचे, कुलदैवतेचे, गुरुचे नामस्मरण,पुजन, भजन, किर्तन, त्यांच्या उपलब्ध चरीत्र्याचे वाचन, पारायण आदी करुन ईश्वराची आराधना करतो. अशा भक्ताला मनुष्य जीवनातील दुर्लभ अशा चार मुक्ती धर्म,अर्थ, काम, मोक्ष मिळाल्याच म्हणून समजा. म्हणून आपण आपल्या मुखाने फक्त हरीचे नाम घ्यावे, त्या हरीचे स्मरण करावे अशा प्रकारे देवांचे नामस्मरण करुन जे पुण्य आपणास मिळणार आहे. त्या मिळणाऱ्या पुण्याची मोजदाद कोण करणार. ईश्वराची आपण करणारी भक्ती मोजण्याचे नक्की साधन मनुष्याकडे नाही. मात्र आपण जर मानत असाल तर आपल्या प्रत्येक कर्माचे हिशोब ठेवण्याचे काम देवांच्या दरबारातील चित्रगुप्तानां दिलेले आहे, या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार चालत नाही, लाचलुचपत नाही टेबलाच्या खालुन आणि टेबलावरुन देणे घेणे नाही, जे कर्म, दुष्कर्म आपण केले आहे त्याची शिक्षा आपणास मिळणारच आणि पुण्यकर्माचे चांगले फळही मिळणारच, आपण हेच लक्षात घ्या कि आपले प्रत्येक केलेले कर्म त्या त्या प्रकारचे फळ देवुनच शांत होते म्हणजेच न्युट्रल होते, आपण जरी संसारात असलात तरी संसार करता-करता हरीची  म्हणजे आपल्या इष्ट देवतेची कोणत्याही रुपाने सेवा करा.पुजाअर्चा करा, भजन-किर्तन करा. अध्यात्मातील धार्मिक ग्रंथाचे वाचन,मनन,चितंन निदीध्यासन करा. वेद-शास्त्र पुराणे हेच सांगतात. पांडवांनी आपल्या भक्तीने श्रीहरीना म्हणजेच द्वारकेच्या राजाला श्रीकृष्णाला आपलासा केला.पांडवाच्या भक्तीने प्रसन्न होवुन श्रीकृष्णदेवाने महाभारताच्या युध्दाच्या वेळी पांडवाच्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्थ केले. ईश्वराची आपण जी आराधना, भक्ती करतो. त्यामध्ये अशी शक्ती निर्माण होते. ज्यामुळे भक्ताच्या संकटकाळी देवांना धावत यावे लागते.

 

अभंग – २

जगाचे आदीकरण हरीच आहे. असे हरीचे गुणगान चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणे करीत आहेत. वरील सर्व ग्रंथाचे आणि पुराणाचे सार म्हणजेच हा आदी असा अनंत आहे. तो या सृष्टीच्या उत्पत्तीपुर्वीही होता, आताही आहे आणि या जगाचा नाश होणार आहे अंत होणार आहे त्यावेळीही असणार आहे हरी म्हणजेच ईश्वर, भगवंत, अनादी आहे अनंत आहे अकल्प आहे निर्गुण आहे सगुण आहे आकार आहे आणि निराकारही आहे, या साऱ्या सृष्टीच्या कणाकणात आहे चराचरात आहे. हे सारतत्व भक्तांनी ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातुन लोणी वेगळे काढतात त्याप्रमाणे घ्यावे आणि त्याचे तुपात रुपांतर करावे म्हणजेच परम श्रध्देने पांडुरंगाच्या चरणी लागल्याचे सार्थक होईल.पांडुरंगाच्या भक्तीचा मार्ग धरल्यावर म्हणजेच नामस्मरण, पुजन, भजन, किर्तन, वाचन, पारायण आदी सर्वमान्य रुढ मार्गाने भक्ती करणे या व्यतिरीक्त पांडुरंगाच्या भक्ताने इतर उपासना मार्गाचा अवलंब केल्यास( योगसाधना, यंत्र, मंत्र,तंत्र आदी, आपणास अधिकार नसताना समाधी लावुन घेणे किवां ध्यानात जाणे. ) आपला वेळ आणि श्रम व्यर्थ दवडल्या प्रमाणे होईल. जीव आणि शिव अशा दोन्ही रुपात हरी हाच एकमेव आत्मा आहे. हे पुर्ण तत्व ग्रहण करावे. दुर्गम अशा योगादी साधनामध्ये हे साधका तु आपले मन घालू नकोस. ज्ञानदेव माऊली म्हणतात की हरी हाच साक्षात वैकुंठ आहे. परमोच्च असा मनाला आंनद देणारा आंनदबिंदू आहे. त्याचे नामच मी घेतो त्यामुळे अनेकत्व विलयास जाऊन ( आपल्या दोन मनापैकी दोन्ही ही मने आपण ईश्वराचे ध्यान करताना पुजाअर्चा करताना इतरस्त्र भटकत असतात म्हणजेच काहीतरी वेगळाच विचार करत असतात.)तरी परंतु एका हरीस शरण गेल्यास हरीचे स्मरण करताना तोच सर्वत्र सघन हरीच भरला आहे असा साक्षात्कार होवू लागतो. म्हणूनच तुझ्या मनाला (आतील बाहेरील) हरीच्या नामात बांधुन ठेव.म्हणजे तुझे जीवन सार्थकी लागेल. हळूहळू असे केलेस तर तु सुध्दा हळूहळू हरीचाच होवुन जाशील.

 

अभंग – ३

सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी तयार झालेले हे जग महत्वाचे नाही. ते सारतत्व नाही. सारतत्व हे या तिन्ही गुणांच्या पलीकडचे आहे. हरीनामाचा पाठ म्हणा  किवां ईश्वराचे चितंन करा.ज्यावेळी तुम्ही याप्रकारे हरीनामात लीन व्हाल त्यावेळी तुम्हाला सार आणि असार यामधील भेद स्पष्ट होईल. जे सगुण नाही आणि निर्गुणही नाही अशी दोन्ही लक्षणे जेथे नाहीत असे हरीचे स्वरुप असे आहे.  तेथे गुणरहीत अवस्था आहे. मनाने असा फक्त विचार करीत बसलास आणि मनात हरीची भक्ती नसेल हरीचे चिंतन नसेल तर हा सारा खटाटोप व्यर्थ श्रमाचा होईल.जो अव्यक्त आहे. ज्याला आकार नाही व जेथुन चराचर उपजते. त्याचे पालन पोषण होते आणि काही कालावधी नंतर ते त्यातच सामावुन जाते. त्या हरीची भक्ती करा. श्रीज्ञानमाऊली म्हणतात की मी रामकृष्णांचे ध्यान मनात केले त्यातच अनंत जन्माचे पुण्य साठवलेले आहे.

अभंग -४

आपल्या मनामध्ये देवांची भक्ती नसेल तर देवांच्या भक्तीचे वर्णन करु नये.  भक्ती नसेल तर अशी भक्ती केल्याने मुक्ती आदी मिळतील अशा प्रकारच्या गोष्टी करु नयेत ज्याप्रमाणे अंगात बळ नसताना  शक्तीच्या.अचाट कामाच्या व्यर्थ वल्गना कराव्यात. देवांची कृपा पटकन कशी प्राप्त होईल ? उगीचच असा विचार करत बसून वेळ वाया घालवू नकोस. प्रपंच करण्यासाठी दिवसरात्र झिजत असतोस मात्र हरीचे नाम घेण्यासाठी तुझ्याकडे वेळ नसतो किंबहुना तो तुला काढावा लागतो त्यातही कुचराई करत असतोस. श्रीज्ञानमाऊली म्हणतात, आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ मिळेल त्या त्या वेळी आपण हरीनामाचा जास्तीत जास्त जप करुन त्यामध्ये स्वताला गुंतवून घ्यावे. त्यायोगाने आपली प्रंपचातील मायेची बंधने तुटून पडतील आणि हळूहळू  पावले परमार्थाकडे वळतील परंतु त्यासाठी प्रथम भक्तीभाव पाहीजे. नित्य हरीचे भजन केले पाहीजे. हरीचा निरंतर ध्यास पाहीजे.

अभंग – ५

योग केल्यानेच सिध्दी प्राप्त होतात असे नाही मग त्यामध्ये ज्याप्रकारचे योग आहेत ते ते सर्व आले. परंतु ते सर्व केले म्हणजे सारे काही झाले असे नाही. काहीतरी आकसाने आणि काही तरी मिळवण्यासाठी स्वार्थाने केलेले विधी म्हणजे धार्मिकतेचा नुसताच डांगोर पिटण्यासारख्रे आहे. परंतु खरी गोष्ट ही आहे की भक्तीभावाशिवाय भगवंताचे स्वरुप नीट समजत नाही उमजत नाही. आणि अशी भक्‍ती करताना आपणास याची काय अनुभती आली  हे आपणास गुरुशिवाय कोण सांगणार. यासाठी गुरुची आवश्कता असते. तप केल्याशिवाय दैवते प्रसन्न होणार नाहीत. आणि आपण काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी प्राप्त होणार नाही. तसेच आपल्या मनाचे मिलन नसेल तर मग आपणास हिताच्या चार गोष्टी तरी कोण सांगणार ?  ज्ञानमाऊली म्हणतात मी अनुभूतीच्या आधारावर सांगतो की संसारातुन तरुन जाण्यासाठभ्‍साधुसंताच्या सावासात आपण जास्तीत जास्त काळ व्यतीत केला पाहीजे. तरच आपणास अशा अनुभूतीचा अनुभव येईल. असे होईल त्यावेळी आपणास परमार्थामध्ये गोडी उत्पन्न होईल.

 पुढील भाग