अध्याय-५-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवदगीता अध्याय –  ५

कर्मसंन्यास योग

 श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय – ५ मधील “कर्मसंन्यास” योग या अध्यायातील  १ ते २९ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन १८० ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये‍ फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही‍ अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे.  हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपा-प्रसाद आहे, आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनाचे कोटकल्याण साधावे.

मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला अहो, हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल, तर त्याचा अंत:करणापासुन विचार करता येईल. यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा हे विविध प्रकारे सांगितले होते. परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता? हे श्री अंनता! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोकांच्या मनाला काही उलगडा होत नाही.

   ऐका, एका सारभूत तत्वाचा बोध करायचा असेल तर ते एकच निश्चीतपणे सांगितले पाहिजे. याबद्दल तुम्हाला दुसऱ्याने विनंती केली पाहिजे का? याकरताच आपल्या                                                                                         सारख्या श्रेष्ठांना मी विनंती केली होती की परमार्थ हा गुढ अर्थाने सांगू नका. पण देवा ! मागील गोष्ट राहु दे आता पस्तुत दोन्ही मार्गापैकी कोणता मार्ग चांगला आहे हे स्पष्ट करून सांगावे. जो मार्ग परिणामी अमृत मधुर आहे ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर बराच पार करता आला पाहिजे अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा.असे  अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते  अर्जुनास म्हणाले, तु म्हणतोस त्याप्रमाणे होईल.सुदैवाने ज्याला कामधेनु सारखी आई लाभलेली आहे त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळावयास मिळतो. (ओवी १ते १० )

           असे पाहा की, शंकरानी प्रसन्न होवून उपमन्युला त्याच्या इच्छेप्रमाणे दुधभात खाण्यासाठी दुधाचा सागर दिला. त्याप्रमाणे औदार्याचे घर असणारा श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाल्यावर  अर्जुन सर्वसुखाचे वसतिस्थान का बरे होणार नाही.यामध्ये आश्चर्य ते काय आहे? लक्ष्मीकांतसारखा मालक लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे म्हणुन अर्जुनाने जे मागीतले ते श्रीकृष्णांनी त्याला प्रसन्न चित्ताने दिले. श्रोतेहो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले तेच मी तुम्हाला आता सांगत आहे. भगवान  श्रीकृष्ण हे अर्जुना ! तात्विक दृष्टीने विचार केला तर कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत. ज्याप्रमाणे नाव पुरूषांप्रमाणेच जशी स्त्रियांना आणि बालकाना पाण्यातुन तरून जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना नेणत्यांना भवसागर तरून जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे. सारासार विचार करून पाहिले असता, निष्काम कर्मयोग फार सोपा आहे याच्या आचरणाने कर्मसंन्यासाचे फळ अनायसे प्राप्त होते. याकरीता तूला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तु जाणशील. जो होउन गेलेल्या गोष्टीची आठवण करीत नाही. एखादी वस्तु प्राप्त झाली तरी त्याचा आनंद मानत नाही. जो मेरुपर्वताप्रमाणे स्थिर असतो आणि हे पार्था ! ज्याच्यां अंतकरणात मी आणि माझे याचे स्मरण देखील राहिलेले नसते तो सदोदित संन्यासी आहे. असे जाणावे. (ओवी ११ ते २० )

      ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली त्याला विषयांची इच्छा सोडून जाते.म्हणून त्याला सहजसुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो अशी स्थिती असलेल्या माणसाला प्रपंच वगैरे काहीच त्यागावे लाग‍त नाही, कारण मीपणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन स्वभावत:च निसं:ग झालेले असते. प्रज्वलित अग्नी विझुन गेला की त्याची राखच शिल्लक राहते ती राख कापसाने देखील धरुन ठेवता येते. त्याप्रमाणे ज्याच्या बुध्दीत संकल्प निर्माण होत नाही तो प्रपंचाच्या उपाधीत असुन सुध्दा कर्मबंधनात सापडत नाही.ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो त्या वेळी संन्यास घडतो आणि म्हणुनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलत: सारखेच आहेत. येऱ्हवी तरी  हे अर्जुना ! जे विचाराने अज्ञानी आहेत ते ज्ञानयोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणु शकतील? जे स्वभावताच अज्ञानी असतात म्हणून ते हे दोन योग भिन्न फल देणारे आहेत असे म्हणतात. येऱ्हवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश काही वेगवेगळा असतो काय ? परंतु दोन्ही पैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेने ज्यांनी परचक्राचा अनुभव घेतला आहे.

         ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गाना एकच समजतात.ज्ञानयोगापासून जे फल प्राप्त होता तेच कर्मयोगापासुन होते  म्हणुन या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरुपता आहे असे पाहा की, आकाश आणि पोकळी यांत जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये भेद नाही.हे ज्याला पटलेले असते.                 (ओवी २१ ते ३० )  ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये काही भिन्न भाव नाही हे जाणले त्याला हया जगतामध्ये ज्ञानसुर्याया प्रकाश दिसतो आणि त्यालाच आत्म साक्षात्कार होतो. जो निष्काम करण्याच्या युक्तीने मोक्षरुपी पर्वतावर चढतो तो आनंदरपी शिखर त्वरेने प्राप्त करून घेतो.जो आपले  अतं:करण शुध्द न करता कर्मयोगाचा त्याग करतो तो व्यर्थच संन्यासी बनण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला खऱ्या संन्यासाची  प्राप्ती कधी होत नाही.

         ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमांपासुन हिरावून घेतलेले तन सदगुरूच्यां उपदेशाने शुध्द केले आणि आत्मस्वरुपाच्या ठिकाणी जोपर्यत समुद्रात मीठ पडले नाही, तोपर्यत समुद्रापेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ  समुद्रात पडले की ते समुद्राएवढे होते. त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचेभ्रम काढले आहेत ज्याचे मन चैतन्यस्वरुप झाले आहे तो पुरूष देहाने परिच्छिन्न असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात मी कर्ता आहे मी कर्म करतो हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली तरी तो अकर्ता असतो. त्या आत्म ज्ञानी पुरूषाच्या देरात मी पणाची आठवण नसते तर मग कर्तृत्वाचा अंहकार कसा राहील.

         हे तु सांग या प्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरूषाच्या ठिकाणी अमुर्त ब्रम्हाचे गुण दिसुन येतात. येऱ्हवी इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे तोही शरीरधारी दिसतो आणि सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो.             (ओवी ३१ ते ४० ) इतर सर्व लोकांप्रमाणे तोही डोळयांनी पाहतो कानांनी ऐकतो पण त्या कर्माचा मी कर्ता आहे असे त्याला मुळीच वाटत नाही, हे आश्चर्य आहे त्याला स्पर्श कळत असतो नाकाने तो गंधाचा अनुभव घेत असतो तसेच प्रसंगाप्रमाणे तो बोलतही असतो तो आहाराचे सेवन करत असतो त्यागावयाचे आहे ते तो त्यागतो झोपेच्या वेळी सुखाने शांत झोप घेतो.तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो अशा प्रकारे तो सर्व कर्मे करत असतो आणखी त्याचे एक -एक व्यवहार काय सांगावेत ? तो श्वास घेतो व सोडतो डोळयानी उघडझाप वगैरे सर्व कर्मे करतो. हे पार्था ! ही सर्वच कर्मे तो करत असतो परंतु आत्मज्ञानामुळे या सर्व कर्माचा कर्ता मात्र तो होत नाही.

        जेव्हा तो भ्रमाच्या शय्येवर झोपी गेलेला होता तेव्हा स्वप्नाच्या सुखाने भुलला होता परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा कर्ता मान‍त नाही. अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे  धाव घेत असतात. दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला तरी या्रग युक्ताची सर्व कर्मे देहात सुरू असतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यामध्ये असुनदेखील ते पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बध्द होत नाही.                (ओवी ४१ ते ५०)

           ज्याची बुध्दी हे चांगले, हे वाईट ही द्वैत भावना जाणत नाही जेथे मनालि अंकुर उत्पन्न होत नाही असे द्वैतभावना रहीत व इच्छारहित कर्म तो देहव्यापार होय. हेच उदाहरण देउन मराठी भाषेतुन सांगत आहे लहान बाळ हे ज्याप्रमाणे द्वैतभावना रहीत व इच्छारहित कर्म करत असते त्याप्रमाणे योगी शरीराने कर्म करीत असतात पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर त्या वेळी झोपी गेलेले असते त्या वेळी एकटे मनच स्वप्नात सर्वत्र भटकत असते. हे अर्जुना! एक आश्चर्य ऐक. जागृत अवस्थेत या वासनेचा केवढा विस्तार आहे ही वासना देहाला जागे होउ देत नाही, परंतु सुख-दुखांचा भोग भोगावयास लावते  इंद्रियांना ज्याची माहिती देखील नसते असे जे कर्म निर्माण होते त्यास मानसिक कर्म म्हणतात अंतकरणाने योगी असणारे मानसकर्म करतात परंतु ते कर्मानी बध्द होत नाहीत कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडुन दिलेली असते.

         एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते किवा पिशाच्चाची बाधा झाल्यावर जसे चित्त असते तसे त्याचे सर्व व्यवहार विसंगत दिसतात. त्यास समोरचे रुप दिसत असते. कोणी हाक मारला तर ऐकू देखील येते तो स्वता बोलतही असतो परंतु या सर्व कर्माची त्याला जाणीव नसते. असो यातील सुत्र असे आहे की प्रयोजनावाचुन जे जे काही केवळ विषयाशी संयोग पावुन कर्म घडते ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले सर्व विषयांचे जे ज्ञान हातो ते केवळ बुध्दीचे कर्म आहे असे तु जाण.(ओवी ५१ ते ६० )

पुढील भाग