अध्याय १६ भाग २

       मानवाचे भले अथवा वाईट करणे हा दैवी संपदा व आसुरी संपदा यांचा लिलाविलास आहे. अशी मांडणी नवव्या अध्यायात बाराव्या आणि तेराव्या श्लोकांमधुन केली होती, तेथे या दोन्ही संपत्तीचा विचार करावयाचा होता, परंतु तितक्यात महत्वाचे वर्णन करण्याचा दुसरा प्रसंग पुढे आला म्हणून आता या अध्यायात दैवी व आसुरी वर्णन करतील. त्या निरुपणाच्या संबंधाने मागील पंधरा अध्याय  झाले त्या पुढील हा सोळावा अध्याय आहे, परंतु आता हे असो, या दोन दैवी व आसुरी संपत्ती ज्ञानाची प्राप्ती व हानी करुन देण्यास समर्थ आहेत हा विषय सांगितला आहे. जी दैवी संपत्ती मुमूक्षूंना मोक्षमार्गामध्ये सोबत करणारी मोहरुपी रात्री वाट चालविण्यास धर्मरुप प्रज्वलित मशाल आहे. तिचे प्रारंभी वर्णन करतो, त्याचे श्रवण कर. एकमेकांना पोषण करणारे असे जे पुष्कळ एके ठिकाणी मिळवले जातात. त्याला संपत्ती असे म्हणतात, अशी जी संपत्ती दैवी सुखाला उत्पन्न करणारी आहे व सर्व दैवी गुणांना एकच निर्वाहाचे साधन आहे, तिला दैवी संपत्ती असे म्हणतात. आता याच दैवी संपत्तीच्या गुणात अग्रभागी असलेल्या गुणावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात. महापुंरामध्ये उडीच घातली नाही तर बुडण्याची भीतीच राहात  नाही, अथवा पथ्यपुर्वक वागणाऱ्या माणसास आजार होण्याची भितीच नसते, त्याप्रमाणे जो सर्व कर्म करतेवेळी अहंकार होवु देत नाही, त्याला संसाराचे  भय कोठुन असणार? (ओवी ६१ ते ७०)

      अथवा अद्वैताभावाच्या विस्ताराने जो संपुर्ण जगत् आत्मस्वरुप आहे असे जाणतो तेथे कोणत्याही प्रकारचे भय रहात नाही, यास अभय असे म्हणतात. पाण्यात मीठ बुडवले असता मीठाचे पाणी होते त्याप्रमाणे आपली अद्वैतभावना झाल्यावर भयाचा नाश आपोआपच होतो. अरे, अभय या नावान जे बोलले जाते ते हेच होय, हे जाणावे, हेच अभय यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पुढे धावणार आणि प्राप्तीनंतर पुढे-मागे उभे रहाणारे पाठीराखे आहेत. आता सत्वशुध्दी जिला म्हणतात ती अशा लक्षणांनी जाणावी, ज्याप्रमाणे राखुंडी जळतही नाही आणि विझतही नाही. त्याप्रमाणे ज्या बुध्दीच्या ठिकाणी संकल्प व विकल्प हे दोन्ही सुक्ष्म अशा मुळ स्वरुपात असतो, अथवा ग्रीष्म ऋतुच्या शेवटी व वर्षा ऋतु सुरू होण्याच्या पुर्वी गंगा नदी जशी स्वाभाविक रुपाने स्पष्ट झालेली असते त्याप्रमाणे संकल्प व विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाहीत आणि रजोगुण आणि तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत तसेच निजधर्माची आवड भोगीत असता जे बुध्दीचे शुध्द स्वरुप उरते, तिला ‘सत्वशुध्दी’ म्हणतात. सर्व ज्ञानेदिंयांनी वाईट अथवा चांगले विषय दाखवले तरी सुध्दा बुध्दीच्या ठिकाणी आश्चर्य होत नाही आणि इच्छाही होत नाही  प्रिय पती गावाला गेल्यानंतरही पतिव्रता स्त्रीला विरहाचे जे दुख होते त्या दु:खावेळी जरी संसारात कितीही लाभ अथवा हानी झाली तरी ती मानत नाही. त्याप्रमाणे स्व-स्वरुपाची आवड निर्माण होवुन बुध्दी अनन्य भावाने एकनिष्ठ होणे याला ‘सत्वशुध्दी’ होणे असे म्हणतात. असे केशि दैत्यास मारणारे श्रीकृष्ण म्हणाले. (ओवी ७१ ते ८०)

      आता आत्मप्राप्तीकरता ज्ञान अथवा योग या दोन्ही पैकी आपली बुध्दी ज्यावर स्थिर होईल त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी, ती अशा रीतीने करावी की, जशी निष्काम पुरुषाने यज्ञातील अग्नी पुर्णाहुती दिली आहे, अथवा कुलीन मनुष्याने आपली कन्या श्रेष्ठ कुळात दिलेली असावी, हा दृष्टात राहु दे समुद्रमंथन केल्यावर त्यातुन श्रीलक्ष्मीदेवी वरती आल्यावर श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला आश्रययोग्य श्री विष्णुदेव असल्यामुळे त्यानांच वरले आणि तेथेच स्थिरावली. त्याचप्रमाणे विकल्परहित होवुन योग अथवा ज्ञान यांच्या ठिकाणी वतनदार होणे तो “ज्ञानयोगव्यवस्थिती” नावाचा  तिसरा गुंण आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले, एखादा शत्रु जरी असला आणि तो संकटात सापडुन दुखी असला तरी त्याच्या करता काया, वाचा, मनाने आणि यशाशक्ती धनाने वंचना न करता जे काही उपकार करणे असते. अर्जुना! ज्याप्रमाणे वृक्ष हा वाटसरुंपासुन पाने, फुले, फळे, छाया आदी लपवुन ठेवत नाही, त्याप्रमाणे मनापासुन धनापर्यत आपल्याकडे जी जी उपयोगी साधने असतील त्या सर्व साधनांच्या आधारे उपकार करण्याचा प्रसंग आला तर दुखी-कष्टी जीवांच्या मनाला समाधान वाटेल अशा रितीने त्यांच्या उपयोगात यावे. त्याला ‘दान’ असे नाव आहे, ते दान मोक्षरुपी ठेवा दाखवणारे अजंन आहे, हे दानाचे वर्णन असो, आता दमाचे लक्षण सांगतो त्यांचे श्रवण कर, ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढुळ पाण्यात निवळीचे बी घातले तर ते पाण्यातील मातीला तळाला नेते आणि स्वच्छ पाणी वेगळे करते. त्याप्रमाणे विषय व इंद्रिये यांचे जे ऐक्य झालेले असते, त्याचा जो वियोग करतो. त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारात वाहु देत नाही ती सर्व इंद्रिये एकत्र बांधुन प्रत्याहाराच्या हाती द्यावीत. (ओवी ८१ ते ९०)

         प्रपंचाची प्रवृत्ती चित्ताच्या आतल्या भागापासुन स्थुल देहापर्यतच्या सर्व भागाचा त्याग करुन बाहेर दुर पळुन जाईल. असा प्रयत्न करावा आणि ती प्रवृत्ती इंद्रियांच्या माध्यामातुन चित्तात घुसु नये म्हणुन दहा इंद्रियांच्या द्वारांमध्ये वैराग्यरुपी प्रखर अग्नी सर्वत्र पसरुन ठेवावा, असे केल्याने इंद्रियांच्या दारात प्रवृत्ती येताच ती जळुन जाते आणि चित्तापर्यत पोचु शकत नाही. प्राणायामापेक्षाही अतिशय कडक व्रतांचे आचरण करणे आणि ती व्रते करत असताना ज्याला क्षणभरदेखील विश्रांती मिळत नाही, त्याला ‘दम’ असे म्हणतात, तो या स्वरुपाचा आहे असे जाण आता ‘यज्ञ’ शब्दांचा अर्थ थोडक्यात सांगत आहे तरी श्रवण कर, ब्राम्हण व स्त्रियादिक यांच्यामधील सर्वानां आपल्या अधिकारांप्रमाणे जे वेदशास्त्र-पुरांणानी विहित कर्म सांगितले आहे, त्यांच्याकरता तेच कर्म उत्तम असते व देवतेची यथाविधी उपासना करणे हा यज्ञ होय. ब्राम्हण हे यजन, याजन, अध्यायन, अध्यापन, दान, प्रतिग्रह ही सहा कर्मे करतात, आणि शुद्र अशा ब्राम्हणानां नमस्कार करतात, परंतु दोघांनीही आपला विहीत धर्म पाळल्यामुळे त्या दोघांनाही यज्ञाचे सारखेच फळ मिळते,‍ प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ करावे, मी यज्ञाचा कर्ता आहे अशा प्रकारचा अहंकाराचा भाव देहाच्या द्वारातुन अंतकरणापर्यत जावु देवु नये, वेदांच्या विधानाने स्थान आपणच व्हावेृ निष्काम भावनेने वेदविहीत विधी करावा, असे आपल्या अंतकरणाला वाटले पाहीजे, अर्जुना! अशा प्रकारचे लक्षण असलेला आणि सर्वाच्या आचरणात येणारा हा ‘यज्ञ’ होय. हा यज्ञ मोक्षाचा सांगाती आहे, खेळणारा हा जमिनीवर चेंडू आपटतो तो उगीच न आपटत नाही तर त्याच्या चेंडू आपटण्यामागे हेतु असतो की तो चेंडु परत आपल्याकडे यावा. अथवा शेतकरी शेतात जे उत्तम बीज पेरतो ते पिकाकडे लक्ष ठेवुनच जमिनीत सर्वत्र पेरत असतो. (ओवी ९१ ते १००)

     अंधारात ठेवलेली वस्तु पाहण्यासाठी जसा दिव्याचा आधार घ्यावा लागतो, अथवा वृक्षास फळे, फुले आदी यावीत यासाठी वृक्षाच्या मुळानां पाणी दयावे लागते, फार काय? आपले स्वरुप पहाण्याच्या हेतुने जसा मनुष्य प्रेमाने आपला चेहरा सारखा स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे वेदांने ज्या ईश्वरांचे वर्णन केले आहे त्या ईश्वराचा साक्षात अनुभव येण्यासाठी अखंडपणे वेदांचे वाचन, चिंतन, मनन आणि त्याप्रमाणे आपले आचरण करावे. त्या परमतत्वाच्या प्राप्तीसाठी ज्ञानयोगी पुरुषांनी ब्रम्हसुत्रांची आवर्तने म्हणावीत भक्तीप्रधान लोकांनी ईश्वरांची स्तोत्रे आणि नाममंत्र म्हणावेत, अर्जुना! स्वाध्याय ज्याला म्हणतात. तो हाच आहे, असे देव म्हणाले, आता ‘तप’ शब्दाचा अर्थ सांगतो, त्याचें श्रवण कर. दानाच्या रुपाने घरातील सर्व काही याचकास देणे अथवा भोगण्यासाठी व्यर्थ खर्च करणे, या दोन्ही मुळे घरातील सर्व धन संपुन जाते शेतातील पिके धान्यरुपी फळे देवुन आपोआप जशी वाळून जातात, सर्वत्र सुगंध पसरविण्यासाठी धुपाला जसा अग्नी प्रवेश करावा लागतो, अथवा सोन्यातील किडाळ काढुन टाकण्यासाठी त्या सोन्यास अग्नीचा दाहकपणा सोसावा लागतो किवां कृष्ण पक्ष वाढविण्यासाठी चंद्राचा ऱ्हास जसा व्हावा लागतो, त्याप्रमाणे हे वीर अर्जुना ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्राण,इंद्रिये व देह यांना शुष्क करणे हे तप होय. अथवा इतर जी तपे आहेत ते असे समज की हंस पक्षी जशी आपल्या चोचीने पाणीमिश्रीत दुधामधून दुध आणि पाणी वेगळे करतो, त्याप्रमाणे जो विवेकाने देह व आत्मा या दोघांना वेगळे जाणतो हा विवेक अंतकरणात सदैव जागृत असला पाहीजे, अंतकरणात हा विचार सदैव जागृत असणे याला’ तप’ असे म्हणतात.  (ओवी १०१ ते ११०)

       आत्मतत्वाचा विचार जागृत झाला असता बुध्दीची विषयांकडील धाव थांबली जाते, ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्ने ही दोन्हीही आपोआप नाहीशी होतात, त्याप्रमाणे हे धर्नुधरा! आत्मतत्वाची प्राप्ती करुन घेण्यासाठी अंतकरणात विवेकाचा  दिप प्रज्वलित होतो ज्याला तप असे म्हणतात. ज्याप्रमाणे दुध बाळास हीतकारक असते अथवा विविध प्रकारच्या भुतमात्रांच्या ठिकाणी चैतन्य जसे सर्वत्र सम प्रमाणात असते त्याप्रमाणे ज्याचे सर्व प्राणिमात्रां  विषयी अत्यंत सैाजन्य पुर्ण आचरण असे असते, त्याला आर्जव असे म्हणतात. जग सुखी व्हावे या उद्देशाने शरीराने वाणीने आणि मनाने जे वर्तन करणे, ते अहिसेंचे स्वरुप आहे असे जाण. आता सत्याचे लक्षण ऐक, कमळाची कलिका पाण्याचा भेद करुन वर येते परंतु ती मऊ असते, किवां चंद्राचे तेजही शीतल स्वरुपाचे असते, जे औषध रोग्याला दाखविताच रोग नाहीसा करते आणि जिभेला तर कडु लागत नाही, असे औषध या जगात निर्माण झाले नाही, तर त्याची उपमा सत्याला कशी देता येईल? मुखमार्जनाचे वेळी पाण्याने डोळयाचे बुबुळास जोराने स्पर्श केला तरी तो बुबुळाला कठीण वाटत नाही पण तेच पाणी नदीच्या प्रवाहाच्या रुपाने जोरात वाहू लागते, त्या वेळी पर्वताचे कडे फोडीत असते. त्याप्रमाणे जे सत्यभाषण संशय नाहीसा करण्यासाठी तलवारीसारखे तीक्ष्णइ असते आणि जे सत्य भाषण ‍ऐकले असता आपल्या कोमलपणाने आणि मधुरपणाने माधुर्यालाही लाजविते जे सत्यवचन ऐकले असता कानांसही त्याचे सेवन करण्याची इच्छा होते, आणि जे सत्यवचन आपल्या सामर्थ्याने ब्रम्हालाही भेदुन वर जाते. फार काय सांगावे? ते सत्य प्रिय असते आणि आपल्या प्रियपणाने कोणालाही फसवत नाही आपल्या यर्थाथ पणाने कोणाच्या मनाला खुपत नाही. (ओवी १११ ते १२०)

       पारध्याचे गाणे खरोखर कानांना गोड लागते परंतु ते अतिशय घातक असते ते हरणांना जाळयात अडकविते, अग्नी जाळण्याचे काम उघडपणाने करतो परंतु अशा प्रकारच्या सत्याला आग लागो, जे भाषण कानांनी श्रवण केले असता मधुर लागते परंतु अर्थाने जे काळजाला झोबंते, अंतकरणाला दुख  देते अशा प्रकारचे  भाषण म्हणजे मोहक रुप धारण करणारी हडळच होय. बाळाचे अकल्याण होत असेल तर आई त्याच्यावर रागवते तिचे रागावणे लटके असते ती बाळाचे लाड करण्याविषयी जणु काही कोमल फुलच असते त्या मातेचा त्या वेळी जसा कोमल भाव असतो त्याप्रमाणे जे श्रवण  केले असता सुखाची प्राप्ती होते, परिणामी गोड असुन ऐकणाऱ्याच्या अंतकरणात द्वेषादी विकार निर्माण होत नाहीत, त्या बोलण्यास येथे सत्य म्हटले आहे. आता अक्रोधाचे लक्षण ऐक. दगडावर कितीही पाणी घातले असता त्याला अंकुर फुटत नाही, अथवा कांजी घुसळली असता त्यातुन लेाणी निघत नाही, सापाच कातीच्या डोक्यावर पायने लाथ मारली असता ती कात फडा काढत नाही, आणि वसंत ऋतु सुरु झाला असता आकाशाला जशी फुले येत नाहीत, अथवा रंभेच्या स्वरुपाने शुक मुनीच्या अंतकरणात विषयकामना निर्माण होत नाही. किवां राखेमध्ये तुप ओतले असता अग्नी प्रज्वलित होत नाही, एखाद्या मुलाला राग येईल असे अपशब्द उच्चारले असता जसा राग येत नाही, तद्ववत बीजमंत्राचे पुरश्चरण केले असता ब्रम्हदेवही मृत्यू झालेल्या माणसाला जिवंत करु शकत नाही, अर्जुना ! त्याप्रमाणे क्रोध‍ निर्माण होण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी थोडादेखील क्रोध उत्पन्‍न होत नाही. या अवस्थेला ‘अक्रोधत्व’ असे म्हणतात, असे ज्याच्या ह्दयात लक्ष्मीचा सदैव निवास असणाऱ्या श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले. (ओवी १२१ ते १३०)

पुढील भाग