पाठीराखा-साई- १८

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  भक्तीत काय शक्ती असते ते आपण पूर्वपार ऐकत आणि वाचत आलो आहे. ज्ञानोबांनी रेडयाच्या मुखातून वेद वदवले. भिंत चालवली. पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह आले आणि विटेवर उभे राहिले. नामदेवाचे नैवद्याचे ताट जेवण केले. गोऱ्या कुंभारास त्याचा  मुलगा परत दिला. संत चोखोबो यांनाही साक्षात्कार दिला. त्यांच्या त्यांच्या भक्तीप्रमाणे त्या त्या रुपात त्यांना दर्शन दिले आणि भक्तीचा महिमा वाढवला. आज कलियुग सुरु आहे. कलियुगातही उत्तर कलियुग सुरु आहे. परीक्षा , सत्वपरीक्षा आता संपल्या असून अध:पात, धर्मनाश, चोरी, भ्रष्टाचार वाढला आहे. पापेही वाढली आहेत. भक्तीमार्गातून मानवाला वेगळे करण्याचे काम कलीने योजनाबद्द रितीने केले आणि याच साठी कलिचे कलियुग होते. मानवातून भक्ती निघून गेली ही कलिची माया आहे. मनुष्य आणि त्याच्या भक्तीत असणारी ताकद ज्या प्रकारे कलिने नष्ट केली आणि अध:पातामध्ये मनुष्यास गुरफटून टाकले. ते आवरण कलिने उभारले आहे. यातून जगताचा नाश ठरलेला आहे. ओढावून घेतला आहे. हे विधीचे विधान आहे. सृष्टीचे चक्र आहे. सृष्टीचा नियम आहे आणि याच यमनियमावर सृष्टी सुरु आहे. या साऱ्या दृष्ट चक्रात जो भगवतांची भक्ती करतो. सार्इंची भक्ती करतो साई त्यास त्याच्या भक्तीचा प्रत्यय निश्चितपणे देतात हे आवर्जून सांगावेसे वाटते. माझ्या भक्तीचा प्रत्येय बाबांनी माझ्या स्वप्नात दृष्टांत देवून दिला आणि मी धन्य झालो. ऑगस्ट महिन्यातील तो भाग्यवान दिवस. कदाचित ७ ऑगस्ट गुरुवारच होता. घराचे काम सुरु असल्यामुळे सुट्टी घेतली होती. त्यामुळे बाबांचे साई सचरित्राचे अध्याय वाचन सुरु होते. सकाळपासून देवपूजा व जप पुढे पोथीवाचन हे ठरलेले. परंतु, असे करताना बाबांचा मला प्रत्यक्ष  स्वप्नात दृष्टांत मिळणे हा विचार मी कधीच केला नव्हता. हा सुवर्ण अमृतयोग त्या दिवशी पहाटे बाबांच्या भक्तीमुळेच आला. बाबांनी स्वप्नात आपले पवित्र दर्शन देवून या भक्तास कृतार्थ केले. माझ्या निस्सिम साईभक्तीची पावती दिली. रात्री साधारण तीन साडेतीन वाजत असतील. मला स्वप्न पडले मी साईबाबांच्या कोणत्या तरी देवळात बाबांच्या आरतीसाठी उभा होतो. देवळात भरपूर गर्दी होती आणि आरतीही जोरात सुरु होती. आरती करता करता अचानक गोंधळ सुरु झाला. साईबाबा आले.. साईबाबा आले .. या गोंधळाने मी आश्चर्यचकीत झालो. ज्या परमपूज्य बाबांची आरती सुरु आहे ते बाबा आले. ते बाबा आले. धन्य धन्य प्रभु साई. मी ज्या बाजूस उभा होतो त्याच्या समोरील बाजूने चौथऱ्याकडून बाबा स्वत: चालत येत असताना मला दिसले. मी देहभान विसरुन बाबांना पहात राहिलो. ते रुप या डोळयात साठवू लागलो. साधारण ५० फूट लांब चालत येवून बाबा एका ठिकाणी उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या सोबत एक वृध्द महिला होती. कदाचित ती राधाबाई किंवा बायजाबाई असावी. परंतु तिच्या कपाळावर रुपयाएवढा मोठा कुंकवाचा टिळा होता. हिरवी नऊवारी साडी नेसलेली होती. ती सुध्दा बाबांच्या बाजूस उभी राहिली. मी बाबांच्याकडे पहात होतो. त्यांच्या डोक्यामागे तेजपूंज, गोलाकार गोळा अक्षरश: प्रकाशमान होता. बाबांचा संपूर्ण सफेद पोशाख होता. अंगावर कफनी डोक्यास कापड. तेजस्वी चेहरा, करारी शरीर. मी पहात उभे असताना काही भक्त दर्शन घेण्यासाठी पुढे जावू लागले. ते दर्शन घेवून बाजुला जाताना दिसले. आता  लोकांचे अनुकरण करत मी बाबांच्या दिशेने चालू लागलो. तेवढयात मलाही कोणीतरी बाबांचे दर्शन घ्या म्हणाले. धन्य माझी साईभक्ती, धन्य ते साईबाबा. मी बाबांच्याजवळ गेलो. त्यांच्या चरणांवर शांतपणे डोके बाबांचा असा सहवास कोण सोडेल? बाबांनी मला दोन्ही हातांनी दोन्ही खांद्यास धरले. बाबा म्हणाले, बाळा आता फार झाले. आता बस्स कर. नको वाकू आता. वाकून वाकून थकलास. बाबांचे ते शब्द ऐकून मी कृतार्थ झालो. याच देही. याच डोळा बाबांचे दर्शन तेही बाबांच्या पायावर डोके ठेवून. कितीतरी मोठा योगायोग. परंतु हे सारे अविस्मरणीय आणि अकल्पित होते एवढे मात्र नक्की. एरव्ही बाबांचा फक्त फोटो पहायाच आणि दर्शन घ्यायचे. परंतु स्वप्नात दर्शन देवून बाबांनी कृतार्थ केले.

 

।। हरि ॐ बाबा ।।