पुस्तकाविषयी थोडेसे

श्रीज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी( जशी आहे तशी )

भगवद् गीतेवर मराठीतुन भाष्य लेखन –श्री ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

 (तसेच सदरचे श्री ज्ञानमाऊलीच्या या अमुल्य भाष्याचे लेखन श्री सच्चिदानंद बाबांनी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी लेखन केले. (इ.स. १२९१ ते १२९३ च्या सुमारास)

श्री साईनाथांच्या कृपेने ( संकल्पना आणि मांडणी) –

श्री.नारायण विठ्ठल देवरुखकर एम.ए (इतिहास) ज्योतीष विशारद , आर्मी रिटायर्ड आणि महाराष्ट्र पोलीस (सहा.पोलीस निरीक्षक) मोबाईल नंबर –८१०८११४४४४ आणि ७७७३९३२८५७

“साईधाम” शाहुपुरी, सातारा. पिन – ४१५००२ ( महाराष्ट्र)

प्रथमावृत्ती  :- २३/०७/२०१८ सोमवार, आषाढी एकादशीच्या पुण्यपावन मुहूर्तावर या पुस्तकाचे काम पुर्ण झाले आणि दि.२७/०७/२०१८ शुक्रवार गुरुपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर या पुस्तकाची ऑन लाईन वेबसाईट www.marathidnyaneshwari.in अशी उपलब्ध झाली.

प्रकाशक – मा.श्री.विठ्ठल बाळकृष्ण देवरुखकर, रिटायर्ड शिक्षक, शाहुपूरी सातारा.

मुखपृष्ठ- मांडणी (डिझाईन) – संगणक अक्षर जुळणी

प्रसाद कॉम्पुटर्स, शाहुपुरी सातारा

प्रसाद नारायण देवरुखकर बी.सी.एस. आणि सायबर सिक्युरीटी एक्सपर्ट

टायपिंग सेटींग – प्रियांका नारायण देवरुखकर. बी.कॉम.

-ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी लेआऊट-

इस्माईल लाटकर, पुणे  www.Gweb.in  mob – 9762241708

Contect us – [email protected]

© नारायण विठ्ठल देवरुखकर , शाहुपुरी , सातारा.

माझे आदर्श… प्रेरणास्थान….

आदरणीय परमपुज्य पिताजी आणि गुरुवर्य

श्री. विठ्ठल बाळकृष्ण देवरुखकर (गुरुजी) यांना……

आपल्यामुळेच… सत्य आणि अहिंसा या मार्गावरुन चालण्यास शिकलो… भ्रष्टाचार, अन्याया विरुध्द आवाज उठवुन निर्भय, निस्वार्थी आाणि प्रामाणिकपणे जगण्यास शिकलो ते तुमच्यामुळेच… नसानसात जिद्द आणि चिकाटी भरुन ध्येय साध्य करेपर्यत अविरत कष्ट करण्यास शिकवले ते तुम्हीच… देवावर आणि दैवावर विश्वास ठेवुन गुरुला जीवन समर्पण करायला शिकवले ते तुम्हीच… इमानदारीने, कष्ट करुन, नितीमत्तेने जगलो तर संपुर्ण आयुष्य ताठ मानेने, स्वाभिमानाने जगता येते… हे सारे बाळकडू पाजले ते तुम्हीच… ही गुरुसेवा श्रीशंकराना, श्रीगुरुदत्तात्रेयांना, श्रीपादांना, शक्तीपीठांना, आदीमातेस, आणि गुरूदेव श्रीसाईना तसेच आपणासही सादर समर्पण…

प्रस्तुत “श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी” हे पुस्तकश्रीशिवपार्वतीच्या, श्रीविठ्ठलरखुमाईच्या, श्रीपाद श्रीवल्लभस्वामीच्या, श्रीज्ञानदेवांच्या, माझे गुरुदेव श्रीसाईंबाबाच्या कृपाशिर्वादाने तद्ववतच दक्षिण काशी कोल्हापुरची श्रीअंबाबाई आणि श्री सरस्वती मातेच्या कृपेने सादर करीत आहोत. किबंहुना मी निम्मीत्त मात्र आहे. श्री ज्ञानदेवांनी (श्री क्षेत्र नेवासा येथे) सर्वच मराठी वाचकांना भगवद् गीतेचा बोध व्हावा आणि त्यांनी प्रपंच्यातुन परमार्थ करावा.यासाठी त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथाच्या परवानगीने (इ.स.१२९१ ते १२९३) श्रीमद भगवतगीतेचे ७०० श्लोक ९००० मराठी ओव्यातुन सांगीतले आहेत.तीच ही अजरअमर ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी. आपणा साठी अत्यंत सोप्या मराठी भाषेत.

            || श्री गुरुदेव दत्त|| || ओम नम: शिवाय ||   || श्रीपाद राजमं शरणं प्रपद्ये ||           

       ||श्री आदीशक्ती माता |||| पार्वतीपतये शंभो महादेव || || सदगुरु साईनाथ महाराज ||

 

श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी या पुस्तकाबद्दल थोडेसे…

(ज्ञानदेवांचाजन्मपुर्व काल आणि त्याच्यां जन्मानंतरही काही वर्षापर्यताचा काल) 

श्री विठ्ठलपंत (ज्ञानदेवांचे वडील) ते काशीचे चैतन्याश्रम स्वामी आणि…

“विधी लिखीत” कोणासही टाळता येत नाही. साक्षात भगवान श्री विष्णुंना प्रभु रामचंद्राच्या अवतारात चौदा वर्ष वनवासामध्ये काढावी लागली, तसेच त्याच वनवासामध्ये माता सीतेचाही विरह सहन करावा लागला, आपल्या परमपुज्य वडीलांचा (अयोध्येचे राजा दशरथ यांचा पुत्र वियोगाने मृत्यू) विरह सुध्दा सहन करावा लागला, परंतु हे सारे त्याच्यांच बाबतीत घडते असे नाही तर तुम्हा-आम्हां सर्वच मनुष्य योनीतील सर्वाच्या बाबतीत हेच होत असते आणि हेच ते “विधी लिखीत”… श्री ज्ञानदेव माऊलीच्या बाबतीत सुध्दा असाच “विधी लिखीत” योग होता की,ज्यामुळे त्यांना  या साऱ्या  दिव्यातुन जावेच लागले. श्री ज्ञानदेवांचे वडील श्री विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी याचें मुळ गाव (जो सध्याचे औरंगाबाद जिल्हा) पैठण तालुक्यात येते, पैठण गावापासुन जवळच गोदावरीच्या उत्तरेकडील बाजुस पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आपेगांव हे गाव आहे, त्यांच्या घराण्यात तेथील कुलकर्णी पद त्याच्या घराण्याकडे पिढीजात होते. श्री ज्ञानदेवांच्या खापर पणजोबाच्या आजोबा पासुन सुरु होते. (शके १०६० म्हणजेच अंदाजे ११३८ सालापासुन उपलब्ध माहीती नुसार) पुर्वीच्या रिवाजाप्रमाणे गावातील शेतसारा वसुलीची कामे कुलकर्णी यांना करावी लागत असत. (शके १०६० पुर्वीपासुनची माहीती आम्हास उपलब्ध झाली नाही.)

       त्याचप्रमाणे त्यांचे घराण्यात नाथपंथाची दिक्षा ही घेतली होती, तत्कालीन पंथामध्ये श्री मच्छींद्रनाथ महाराजांचा नाथपंथ हा समाजात न्यायाने आणि सत्याने वागणारा तसेच तत्कालीन जनतेस सुख दुखात मदत करणारा होता. ज्ञानदेवांचे पणजोबा श्री त्र्यबंकपतांनी नवनाथां पैकी श्री गोरखनाथ यांच्या  पासुन अनुग्रह घेतला होता. तसेच त्यांच्या खापरपणजोबा पर्यत आपेगावंचे कुलकर्णीपदही पिढीजात चालवले.त्यांचे पणजोबा श्री.त्र्यबंकपंतानी  देवगिरीच्या यादवराजाच्या पदरी प्रांताचे अधिकारी म्हणुन काम पाहीले. त्यानंतर त्यांचे आजोबा श्री हरीहरपंत हे सिधंण या देवगिरीच्या यादवराजाच्या बाजुनी लढाईत लढताना वीरमरण आले तर ज्ञानदेवांचे आणखी एक आजोबा श्री गोविंदपंत यांनी नाथपंथातील श्री गहीनीनाथा कडुन अनुग्रह घेतला होता. याप्रकारे नाथपंथाची परंपराही  श्री ज्ञानदेवांच्या घराण्यात पिढी दर पिढी सुरू झाली होती.

श्री गोविंदपंत आणि त्याच्या पत्नी सौ निराई हे श्री पंढरपुरच्या पांडुरंगाचे भक्त होते, परंतु त्यानां लवकर संतान झाली नाही श्री गोविंदपंताना त्यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षी संतान झाले, पांडुरंगा वरील भक्तीमुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठलपंत असे ठेवले.व्रतबंध झाल्यावर विठ्ठलपंत कुलकर्णी हे तीर्थयात्रेसाठी त्याच्या आपेगावांहुन तीर्थस्थळी भेट देत देत श्री क्षेत्र  आळंदी येथे आले, याठिकाणी त्याची भेट आळंदीचे श्री सिधोपंत कुलकर्णी यांच्याशी झाली त्यावेळी श्री सिधोपंताना स्वप्नात श्री पांडुरंगानी दृष्टांत देवुन त्यांच्या मुलीचा विवाह विठ्ठलपंता बरोबर करण्यास सांगितले, याच दरम्यान श्री विठ्ठलपंताना पडलेल्या स्वप्नात श्रीपांडुरंगानी सिधोपंताच्या कन्येशी विवाह करण्यास सांगितले, तत्पश्चात त्यांना रुक्मीणी देवीच्या पोटी ” भक्ती, ज्ञान, वैराग्य संपन्न अशी चार मुले जन्माला येतील” असे सांगितले.आळंदीचे श्री सिधोपंत आणि आपेगावाहुन तीर्थयात्रा करत आलेले विठठलपंत या दोघांनीही स्वप्नात पंढरीच्याश्रीपांडुरंगानी दिलेल्या दृष्टातांनुसार आपली स्वप्न एकमेकांना सांगितली त्यानुसार विठ्ठलपंतानी आळंदी निवासी सिधोपंताची कन्या रुक्मीणीदेवी यांच्याशी विवाह केला. त्यानंतर पंढरपुर येथे सिधोपंत यांच्याबरोबर आले आणि श्रीपांडुरंगाचे दर्शंन घेतले.त्यानंतर सर्वजण आपेगांवाला आले. तेथे विठ्ठलपंतानी आपल्या आई-वडीलांचा आर्शिवाद घेतला आणि ते आपल्या पत्नीसह तेथेच राहीले त्यांचे सासरे श्री सिधोपंत हे आळंदीला आले.पुढे काही कालावधीनंतर विठ्ठलपंताचे आईवडिल वैकुंठवासी झाले आणि काही दिवसातच श्री विठ्ठलपंताना संसारात विरक्ती आली ही बातमी सिधोपंताना कळाली त्यामुळे त्यांनी विठ्ठलपंताना आणि त्यांच्या कन्येला दोघांनाही आळंदीला आणले परंतु विठ्ठलपंतानी संन्यास घेतला, आणि त्यांनी काशीला जावुन श्री नृसिंहश्रम यांच्याकडुन संन्यास दिक्षा घेतली आणि विठ्ठलपंतांचे “चैतन्याश्रम” संन्याशी  झाले.

पुढे विधीचे विधान की ज्याला कोणी टाळु शकत नाही,  त्याप्रमाणेच घडले…. संन्याशी झालेल्या  चैतन्याश्रम स्वामी आणि पुर्वाश्रमीचे श्री विठ्ठलपंत यांच्या पत्नी रुक्मीणी देवी या आळंदीक्षेत्री साधनेमध्ये आणि देव भक्तीमध्ये लीन झाल्या त्यांनीही साधनेला सुरुवात केली, एकदा नेहमी प्रमाणे त्या अश्वत्थ वृक्षास प्रदक्षिणा घालत होत्या.त्यानंतर त्यांनी या ठिकाणी आलेल्या एका साधुसंन्याशी यांचे दर्शन घेतले असता त्यांनी  रुक्मीणी देवी यांना आर्शिवाद दिला तो होता “पुत्रवती भव्!” त्यामुळे रुक्मीणीदेवी यांनी त्या साधुसंन्याशी नृसिंहाश्रम यांना त्यांचा वृत्तात सांगितला.तदनुसार पुढे हेच काशीचे संन्याशी काशी येथे गेले आणि त्यांनी चैतन्याश्रम महाराजाची भेट घेवुन पुन्हा संसार करण्यासाठी चैतन्याश्रमानांआज्ञा दिली. आपल्या गुरुंनी आज्ञा दिल्यामुळे पुर्वाश्रमीचे श्री विठ्ठलपंत हे आळंदीक्षेत्री आपल्या पत्नीजवळ आले आणि आपल्या गुरुंच्या आदेशानुसार आपण पुन्हा संसार करणार असल्याचे सांगितले…. परंतु एकदा संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार करण्यास तत्कालीन समाज मान्यता देत नव्हता.त्यामुळे त्यांना सर्वाचा विरोध स्वीकारुन गावाबाहेर झोपडी बांधुन रहावे लागले. तत्कालीन समाजाकडुन त्यांची अवहेलनाही झाली. तरीही हे दापंत्य अखंड ईश्वर साधना आणि प्रंपच करीत राहीले.

 भक्ती,ज्ञान,वैराग्य संपन्न….’संता’नांचा जन्म

(निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांचा)

पुढे श्री विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मीणीदेवी यांना शके ११९५ मध्ये म्हणजे १२७३ साली श्रीमुख संवत्सर माघ वद्य प्रतिपदेच्या शुभदिनी वार सोमवार प्रातकाळी “निवृत्तीनाथां” चा जन्म झाला. त्यानंतर शके ११९७ मध्ये म्हणजे १२७५ साली युवा संवत्सर श्रावण वद्य अष्टमी वार गुरुवारी मध्यरात्री “ज्ञानेश्वरांचा” जन्म झाला. त्यानंतर शके ११९९ मध्ये म्हणजे १२७७ साली  ईश्वर संवत्सर कार्तिक शुध्द अमावस्येच्या प्रहररात्री “सोपानदेवांचा” जन्म झाला. शके १२०१ मध्ये म्हणजे १२७९ साली प्रभावी संवत्सर अश्विन शुध्द प्रतिपदा वार शुक्रवारी माध्यानी “मुक्ताबाईचा” जन्म झाला. अशा प्रकारे श्री पांडुरंगानी  विठ्ठलपंताना स्वप्नात सांगितल्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, वैराग्य संपन्न चार संताने झाली.

संन्याशीची मुले आणि नाथपंथाची (दिक्षा) महान परंपरा…

अशा प्रकारे एका संन्याशाच्या पोटी जन्म झाल्यामुळे या चार भावंडाना समाजाकडुन भयंकर अवहेलना सहन करावी लागली. काही कालावधीनंतर श्री विठ्ठलपंतानी आपल्या सर्व कुटूंबासह अनुष्ठानासाठी (नासिक पासुन २१ कि.मी.) त्र्यंबकेश्वर  येथे प्रयाण केले या ठिकाणी पहाटे तीर्थराज कूशार्वतात स्नान करुन  सर्वानी  ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा करत असताना वाटेत एक वाघ आला यावेळी त्यांची चुकामुक झाली आणि निवृत्तीनाथ वाट चुकून एका गुहेत आले परंतु या ठिकाणी त्याची भेट श्री गहीनीनाथांशी झाली त्यांना या तेजस्वी बालकाला पाहुन संतोष झाला त्या नंतर श्री गहीनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या मस्तकावर आपला हात ठेवून नाथ पंथाची दिक्षा दिली. (एकप्रकारे श्री गहिनीनाथांनी समाजाने वाळीत टाकलेल्या आणि अवहेलना केलेल्या निवृत्तीनाथांना मायेची सावली दिली तसेच आपले म्हणुन प्रेमाने, मायेने त्यांना जवळ केले खरतर यामुळे त्यांना कितीतरी मानसिक समाधान लाभले असेल)

        पुढे निवृत्तीनाथांची आणि आईवडिलांची आणि भावंडाची भेट झाली त्यानंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना नाथपंथाची दिक्षा दिली आणि अशा प्रकारे ज्ञानदेवही नाथपंथाचे अनुयायी झाले. त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवून दिक्षा दिली. अशा प्रकारे ज्ञानदेव नाथपंथीय झाले, ज्या प्रकांड पंडीतानी श्री विठ्ठलपंताना आणि त्यांच्या मुलांना नाकारले होते, त्यांच्यावर बहिष्कार टाकला एवढेच काय त्यांना भिक्षा देण्यास ही मनाई केली होती. एकंदरीत त्यांचे जगण्याचे हक्कच नाकारले होते. त्यांना तत्कालीन समाजात वावरण्यास गहीनीनाथांनी मानाचे स्थान दिले. आणि ही नाथपंथाची परंपरा  श्री आदीनाथां (भगवान शिवशंकर) पासुन पुढे श्री मच्छिंद्रनाथ -श्री गोरक्षनाथ-(श्री त्र्यबंकपंत)श्री गहिनीनाथ- (श्री गोविंदपंत) श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वर अशी सुरु राहीली. सर्वच नाथ आणि नाथपंथाचे अनुयायी  हे तत्कालीन जनमाणसात वावरत असत आणि जनमानसाच्या अडीअडचणीत उपयोगी पडत असत, सर्वच नाथांना शाबरी विद्येचेही ज्ञान होते, त्या विद्येचा समाजकल्याणासाठी उपयोग करत असत. काही काळानंतर  म्हणजे इ.स. १२८८ साली म्हणजे मुक्ताबाईच्या जन्माच्या ९ वर्षानंतर सर्व नाथ हे गुप्त झाले म्हणजे त्यांनी समाधी घेतल्या. असा नवनाथ कथासार या ग्रंथात उल्लेख आहे. (कृपया जिज्ञासु वाचकांनी संपुर्ण माहीती साठी श्री केळकर गुरुजींनी संपादन केलेला श्री नवनाथ कथाासार हा मोठा चाळीस अध्यायाचा ग्रंथ अभ्यासावा…) असो.

माणुसकी विकली गेली होती काय ?

श्री. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी मुळ राहणार आपेगांव ता- पैठण जि- औरंगाबाद सध्या राहणार- देवाची आंळदी (पुणे )आणि त्यांचे कुटूंबिय म्हणजेच पवित्र, पत्नी निर्मळ अतंकरणी सौ.रुक्मीणीदेवी तसेच त्यांची अत्यंत लहान-लहान मुले निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी असा कोणता मोठा अपराध केला होता, कोणता गुन्हा केला होता की, त्यांना तत्कालीन समाजाच्यामाथेफिरुंनी एकदम वाळीत टाकले, त्याच्यांशी हितसंबंध तोडून टाकले, तत्कालीन समाज हा अधंश्रध्दा आणि शेंडी, दाढी व जाणव्याच्या एवढा आहारी गेला होता का ? की गुरफटला गेला होता? का त्यांनी हा समाज चालवणाराचा, असला माणुसकीस काळीमा लावणारा फतवा स्वीकारला ? तत्कालीन समाजाचे मन एवढं मारलं गेलं होत का? की माणुसकीच विकली गेली होती ? का समाज विठ्ठलपंत आणि त्यांचे कुटूंबियाशी एवढया कठोरतेने वागला? त्यावेळी त्यांनी स्वतामध्ये विठ्ठलपंताना का पाहीले नाही ?

तत्कालीन समाज चालविणाऱ्याचे चर्मचक्षू त्यांच्या ज्ञानचक्षूंपेक्षा ही जास्त कार्यरत होते की, त्यांना श्री विठ्ठलपंत हे त्यांना दिलेल्या गुरुंच्या आदेशाचे पालन करीत आहेत याची मुळीच जाणीव नसावी. श्री विठ्ठलपंत हे कुणी सर्व सामान्य व्यक्तीमत्व नव्हतेच मुळी,  मुळातच ते एक पुर्वाश्रमीचे गृहस्थाश्रमी होते परंतु भाग्यवश किवां दैववश त्यांना संन्याश घ्यावा लागला हे त्यांच्या हातात नव्हते, हा तर नियतीचा खेळ होता, ते तर नियतीच्या हातातील बाहुले होते. आणि नियतीला काहीतरी वेगळेच करायचे होते, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात चढ-उतार हे असतातच, जीवनात सुख-दुखेही असतातच हे आपआपल्या कर्माचे फळही असु शकते? कर्मभोगही असु शकतात? मानवी जीवन हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे, आपण विचार करतो तेवढे हे सहज शक्य नाहीच नाही? याचा बोध समाज चालविणाऱ्याना नव्हताच का? मग ते कोणत्या प्रकारचे ज्ञानवंत, बुध्दीवंत होते? असो.

तुका म्हणे एैशा नरा , मोजुन माराव्या पैजांरा

जे काय असेल ते पंरतु प्रश्न आजही त्यांच धर्म शास्त्र जाणकारांचा आहे. (आजमितीस असे वाळीत टाकण्याचे धाडस कोणीही तथाकथीत धर्माचा पुढारी किवां आजच्या भाषेत नेता करणार नाही. कारण धर्म किवां त्या धर्माचे आदेश देणारा किवां त्यांचा अनुयायी हा असे काही केल्यास एक तर तुंरुगात असेल किवां ज्याला वाळीत टाकले त्याच्या सबंधाने इतर कोणाच्या तरी रोषांचा बळीअसेल) तरी परंतु असे धर्म शास्त्रांचे जाणकार किवां पुढारपण करणारे कशासाठी.जर त्यांना एकादयाच्या भुत-भविष्य-वर्तमाना बद्दल काही माहीती नसेल? (ग्राहय धरा किवां न धरा, पंरतु सिधोपंताना आणि विठठलपंताना श्री क्षेत्र आळंदी येथे श्री पांडुरंगानी स्वप्नात दृष्टात देवुन सांगितले होते.त्याप्रमाणे हे सारे घडले होते मग याची प्रकांड पंडित म्हणवणाऱ्याना यत्किचींतही माहीती नसावी काय?) मग ते कशाच्या आधारे असा एकादयाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेवु शकतात? अशा उर्मट पंडिताना संत तुकाराम म्हणतात तसे तुका म्हणे एैशा नरा,मोजुन माराव्या पैजांरा ||हीच न्याय निती लागु होते.

 दैव जाणिले कुणी ?

अखेर आपल्या मुलांच्या व्रतबंधासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मीणीदेवी यांनी प्रकांड पंडितांच्या सांगण्याने जल समाधी घेतली….

माणुसकी फक्त विकलीच गेली नव्हती तर षढंही झाली होती आणि म्हणुन अशी भयानक घटना घडली , कि कदाचित काळही काही वेळ नक्कीच सुन्न झाला असेल, त्यालाही अशा  महान त्याग करणाऱ्या दापंत्याला कवटाळताना अक्षरक्ष: लाजच वाटली असेल, वयात आल्यावर आपल्या मुलांचे  व्रतबंध करावेत ही आजही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असतेच , त्याचप्रमाणे विठ्ठलपंतानी अशी इच्छा व्यक्त केली तर नवल नव्हतेच मुळी, परंतु नवल तर पुढे होते कि तत्कालीन प्रकांड पंडितांनी या दापंत्याना इंद्रायणीत जल समाधी घेण्याची शिक्षा घेतली तर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांच्या मुंजी, व्रतबंध आम्ही करु असे सांगितले

     आपल्या मुलांचे व्रतबंध होण्यासाठी तसेच त्यांना वेद, पुराणे, शास्त्रे यांचे शिक्षण घेता यावे म्हणुन या पवित्र दापंत्यानी मुलांना  माहीती न देता भल्या पहाटे इंद्रायणीत जल समाधी घेतली. अशा या भयानक प्रसंगाने शब्द शांत झाले, अशा कुटुंब वत्सल, पवित्र दापंत्याला  आपल्या पात्रात सामावुन घेताना इंद्रायणीचे हे डोळे भरुन आले असतील. नियतीनेही डोळे झाकून घेतले आणि कदाचित दैवाने आपल्याच कपाळावर हात मारुन घेतले असेल…. काळाचे ही काळीज थरथरले असेल… आणि  आपले मायेचे छत्र हरवलेल्या त्या चार चिमुरडयाचे मन तर चिधंडया, चिधंडयाच झाले असेल परंतु आता काहीच उरले नव्हते, उरल्या होत्या फक्त आठवणी आणि त्यासुध्दा निवृत्ती, ज्ञाना, सोपाना, मुक्ता साठी… बाकी सारे झाले होते सुन्न… सुन्न…. आणि सुन्नच….

शुध्दीपत्र… शास्त्रसमंती… आणि वेद म्हणणारा भाग्यवान रेडा…

आपल्या आई-वडीलांच्या दुखद निधनातुन सावरत असताना त्यांना आळंदीही सोडावी लागली, संकटानी त्यांचा अजुनही पिच्छा  सोडला नव्हता कारण प्रकांड-पंडितांनी चार भावंडाना व्रतबंध (उपनयन, मुंजी) करण्यासाठी पैठण येथुन शुध्दीपत्र आणावे लागेल ही अट घातली, आणि अशा रितीने निवृत्ती,ज्ञाना, सोपान, मुक्ता अशी सर्वजणानी  पैठण कडे प्रस्थान केले. पैठण येथे पोहोचल्यानंतर ही त्यांना होणारा विरोध चालूच होता परंतु तरीही तेथील पंडीतांना कानोकानी त्यांच्या आई-वडिलांनी जलसमाधी घेतल्याची बातमी लागल्याने विरोध मावळला तरीही त्यांना व्रतबंध, मुंजीसाठी  शुध्दीपत्र कोणत्या आधारावर दयायचे ही चर्चा सुरु झाली, आणि शास्त्र चाळुनही  असे उल्लेख मिळत नसल्याने शुध्दीपत्र कोणत्या आधारावर दयायचे? अशी चर्चा चालु होतीच एवढयात ज्ञानदेवांना शुध्दीपत्र देण्याबद्दल एक विचित्र अट घातली आणि ती म्हणजे तेथील एका रेडयांच्या तोंडुन वेद म्हणवुन दाखवायचे?

आणि चमत्कार घडलाज्ञानदेवांनी ती अट स्वीकारलीच पुढे निवृत्तीनाथांना वाकुन वंदन केले कारण निवृत्तीनाथ थोरला भाऊ तर होताच पण नाथपंथाची दिक्षा ज्ञानदेवांना दिल्यामुळे त्यांचे गुरुही होतेच अर्थात शिष्य या नात्यानेही ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना वंदन केले. गुरु निवृत्तीनाथांनी त्यांना आर्शिवाद दिले, पुढे ज्ञानदेवांनी रेडयांच्या मस्तकावर हात ठेवला आणि मनात इष्ट देवतांचे, आपल्या आईवडिलाचेही स्मरण ही केले असावे आणि आपल्या बंधुचे (गुरुंचे) स्मरण करुन रेडयास वेद म्हणण्याची आज्ञा देताच रेडयाने आपले काम चोख बजावले, आणि तो रेडा अस्सखलित वेद म्हणू लागला,

उपस्थित ब्रम्हवृंदाना तोंडात बोट घालण्याखेरीज उपाय नव्हता तर प्रकांड पंडितांच्या भुवया कपाळात राहील्या असतील हे केवळ अशक्य असेच घडले होते. परंतु मान्य तर करावेच लागणार होते. उपस्थित सर्वच आश्चर्य करीत होतेच परंतु नवल घडलेच होते सर्वजण ज्ञानमाऊलीना नमस्कार करुन त्यांचे दर्शन घेत होते हळुहळू ही बातमी वा-या सारखी संपुर्ण पैठण नगरीत झाली तसेच आळंदीलाही गेली… आणि ज्ञानाचा श्री ज्ञानदेवराया झाला, दगडाचा देव झाला… निवृत्तीही त्याच्या भावासह आणि बहीणीसह सुखावला परंतु अत्यंत आंनद झाला असेल तर त्याच्या स्वर्गस्थ आई-वडिलांना आज त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सफलसुफल झाले, त्यांचे जलसमाधीचे बलिदान वाया गेले नाही. त्याच्यां आत्म्याला शांती मिळाली असेल… खरंतर एवढी सत्वपरीक्षा देवुन देवच स्वता आता देवपणात आले, परंतु त्यांनी मनुष्यपणात सोसावे लागणारे तत्कालीन हालअपेष्टा भोगून लोकांसमोर असे कठोर न वागण्याचा धडा दिला असावा. सर्व सामान्य मनुष्यास अशा हाल अपेष्टा सोसणारच नाहीत.

घडणारे घडले होतेच आणि ते सुर्यप्रकाशाएवढे तेजस्वी सत्य होते. पुढे या चारीही जणांनी पैठणवासीयांचा तेथेच रहाण्याचा आग्रह टाळला आणि काही दिवसातच ते सर्व भावंडे श्री क्षेत्र नेवासा येथे आली. तेथे त्यांना मन शांती मिळाली तर ज्ञानमाऊली साठी तर ती अध्यायात्माची पंढरीच ठरली. (खरंतर या ठिकाणाला पौराणिक स्थान विशेषही आहे, नेवाश्यात मोहनीराजाचे मंदिरही आहे ज्यांना म्हाळसादेवी या नावाने संबोधले जाते, हे भगवान श्रीविष्णुंनी समुद्रमंथनाच्या वेळी मिळालेला अमृतकलश घेण्यासाठी तो कलश देवांना मिळण्यासाठी या रुपात दैत्यांना मोहीनी पाडण्यासाठी घेतलेले रुप आहे) पुढे ही चारही भांवडे येथेच स्थिरावली आणि आपले गुरु निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनानुसार ज्ञानदेवांनी आपला विश्वासाठीचा अध्यात्माचा प्रवास सुरु केला, आणि लवकरच मराठी भाषेचेही भाग्य उजळुन आले. तो सोनियाचा दिवस मराठीच्या क्षितीजावर उगवला कि ज्यांने भगवंताची ७०० श्लोंकाची भगवद् गीता  ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी म्हणुन नऊ हजार ओव्यांत रुपांतरीत झाली.

आपले परम गुरु श्री निवृत्तीनाथांच्या कायम मार्गदर्शनात राहुन त्यांनाच देव म्हणणाऱ्या श्री ज्ञानदेवांनी आपली ज्ञानेश्वरी संपुर्ण झाली तेव्हा आपल्या गुरुंना श्री निवृत्तीनाथांना उद्देशुन म्हटले आहे की, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषुनी मज दयावे पसायदान हे. धन्य ते गुरु श्री निवृत्तीनाथ आणि धन्य त्यांचा परम शिष्य श्री ज्ञानमाऊली…. यांना त्रिवार वंदन करुन आणि अजुन काहीही न बोलता ” मौनंम सर्वार्थ साधनमं ” अशाच दृढ भावनेने त्यांच्या चरणी ही शब्दसेवा प्राणासम अर्पण….

*** (वाचकांना विनंती असे की वरील माहीती ही ज्ञानेश्वरी व्यतीरिक्त परंतु पुरक आणि सत्य आहे.) तत्कालीन समाजाने आज ज्या ज्ञानदेवांची आळंदीच्या  मंदिरात ज्या सन्मानाने त्यांची पुजाअर्चा होत आहे, पालखीसमोर ज्याप्रकारे लाखो भक्तगण, वारकरी गर्दीच गर्दी करत आहेत. श्री क्षेत्र पढंरपुर येथे जाणाऱ्या माऊलींच्या पालखी  सोहळयात आवर्जुन सहभागी होवुन आषाढ वारी करणारे झाले आहेत. त्याच ज्ञानदेवांना त्यांच्या माता पित्यासमवेत त्यांच्या सर्व भावंडासह तत्कालीन समाजात पांडित्य करणारे (आपल्या अंहकारी ज्ञानाचा टेबां मिरवणारे)  आणि समाजातील काही  घटकांनी अक्षरश: वाळीत टाकले होते. आता सर्व ज्ञानवंत आणि गुणवंत वाचकांनी त्याच गुरुमाऊलींनी तत्कालीन समाजाने केलेली अवहेलना सोसुन ही तुमची आळंदीच नव्हे तर हे विश्वची माझे घर असा मोलाचा संदेश दिला असुन आपणा सर्वासाठी जगाचे कल्याण व्हावे म्हणुन असलेली भगवद गीता तीच सोप्या मराठी भाषेत सांगितली आहे, या अमुल्य ठेव्याचे आपण मनपुर्वक वाचन करावे आणि मोक्षाचा मार्ग शोधावा. तसेच या संसारातुन वेळ काढत भगवंताची निस्वार्थी भक्ती करावी. (खरे तर ज्ञानमाऊली आणि सर्व भावंडे देवांचेच अवतार होते याबाबत नवनाथ कथासार मध्ये उल्लेख आहे, परंतु तत्कालीन धर्म वाद्यांचे बुरखे उतरवण्यासाठी त्यांना अशा दिव्यातुन जावे लागले.) सर्व भाविक वाचकांनी पुढील अध्याय रुपात पुर्ण मराठीत दिेलेली “ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी” अवश्य वाचावी या मध्ये काही पर्यायी शब्द रचने व्यतीरिक्त कोणतेही बदल केले नाहीत. किवां त्यातील अर्थाचा विपर्यास केला गेलेला नाही.

महत्वाची टिप:- हे सर्व टायपिगंचे काम व इतर सर्व सोपस्कर माझे गुरुदेव श्रीसाईच्या कृपेने,प्रेरणेने आणि त्यांच्या माझ्यावरील अतीव प्रेमाने मी लेखकाने स्वत: गेली वर्षभर माझ्या मुला, मुली सह पुर्ण प्रामाणिक पणाने तन-मन-धन अर्पुन निस्वार्थीपणाने केलेली ही माऊलींची सेवा आहे. जर चुकीने असे काहीही शब्द आलेले असल्यास, पुर्ण मराठीत अर्थ करत असताना काही विर्पयास नजरचुकीने झाला असल्यास किवां आपले काही म्हणणे असल्यास ज्ञानार्जनाच्या दृष्टीने कोणत्याही आकसाने नव्हे, आमच्या ई-मेल किवां मोबाईल वर निदर्शनास आणून दयावेत. म्हणजे तात्काळ बदल केले जातील. असे कोणतेही बदल किवां अर्थसदृश्य वाक्ये मराठी शब्दरचना जुळवीताना झाले असतील, अशा सुचनाचे स्वागतच आहे.(लेखक या नात्याने माझे हेच पुर्ण प्रयत्न केले आहेत की सामान्यातही सामान्य मराठी वाचकास ज्ञानेश्वरी वाचनाचा पुर्ण लाभ मिळावा. ज्ञानेश्वरी वाचनाचा लाभ घेत असताना त्याला संसारसागर कसा पार करावा याची प्रचिती स्वतालाच यावी या करीतासाईकृपेने हे त्यांचेच प्रेरणाकृत आत्ता पर्यतचे सर्वात सोपे लिखाण आहे, मी केवळ निमीत्तमात्र आहे हे आपणास पुर्वीच सांगितले आहे. त्यासाठी श्रीज्ञानेश्वरींच्या बऱ्याच प्रतीचे वाचन आणि मतीतार्थ शोधता-शोधता इतपर माऊलीनींच ही सेवा करुन घेतली आहे. तेव्हा कोणताही स्पर्धात्मक हेतु न ठेवता सर्व सामान्यासाठी हे एक पुढचे पाऊल आहे.) ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवासम सुंदर हे.     ओम साईराम… रामकृष्णहरी…

महत्वाचे आणि सर्वाच्या माहीतीसाठी – कॉपीराईट कायदा सन १९५७ व नियम १९५८हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ आणि आंतरराष्ट्रीय कायदा कॉपीराईट हुकूम १९९९यातील प्रकरण – ५ नियम – २२ नुसार भारतीय साहित्यकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार ०१ जानेवारी १९५६ पुर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मराठी भाषांतरीत मधील अध्यायानुसार श्लोक आणि ओव्याची संख्या

अध्याय क्रमांक अध्यायाचे नाव श्लोक संख्या ओव्याची संख्या
१) अर्जुन विशादयोग ४७ २७५
२) सांख्य योग ७२ ३७५
३) कर्म योग ४३ २७६
४) ज्ञानकर्म संन्यास योग ४२ २२५
५) कर्म संन्यास योग २९ १८०
६) आत्मसंयमन योग ४७ ४९७
७) ज्ञानविज्ञान योग ३० २१०
८) अक्षरब्रम्ह योग २८ २७१
९) राजविद्या राजगुह्ययोग ३४ ५३५
१०) विभुती योग ४२ ३३५
११) विश्वरुप दर्शन योग ५५ ७०८
१२) भक्ती योग २० २४७
१३) क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ३४ ११७०
१४) गुणत्रय विभाग योग २७ ४१५
१५) पुरुषोत्‌तम योग २० ५९९
१६) देवासुरसंपद्विभाग योग २४ ४७३
१७) श्रद्धात्रय विभाग योग २८ ४३३
१८) मोक्षसंन्यास योग ७८ १८१०

अशा प्रकारे एकुन ७०० श्लोक आणि ९००० ओव्या आहेत. या सर्व श्रीज्ञानदेवांच्या परमकृपार्शिवादाने सध्याच्या बोली आणि लिखीत मराठी भाषेत सदरच्या ग्रंथात सोप्या रितीने दिलेल्या आहेत.किंबहुना श्रीज्ञानेश्वरीचे अशा प्रकारे अत्यंत सोप्या मराठीत भाषातंर करण्यासाठी श्रीसाईकृपेने माऊलीनी माझी निवड केली हेच माझे मी परम भाग्य समजतो. या अमुल्य अध्यात्म कस्तुरीचा आपण भक्तजनांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही मनापासुन प्रार्थना.

                   – दोन वर्ष पुर्तीच्या निमित्ताने-

तारीख – २७/०७/२०१८ अध्यात्मविश्वात एक नवीन आश्चर्य घडले. श्रीसाईकृपेने कोणतेही प्रयोजन नसताना माझ्याकडुन श्रीज्ञानेश्वरीचे आत्ता पर्यतच्या सर्वात सोप्या मराठीत भाषातंर झाले. आणि या भाषातंराची www.marathidnyaneshwari.in ही वेबसाईट जगभर जिथे जिथे मराठी वाचली पाहीली जाते. तेथे सर्व भक्ताच्या सेवेत रुजु झाली. तो दिवस २०१९ मधील गुरुपौर्णिमेचा. खरतर भक्तजन हो, माझ्याकडुन कोणत्यातरी अनामिक शक्तीने हे काम अगदी काटेकोरपणे करुन घेतले. त्यामुळे मी केले असे मीपण ही उपाधी नकोच आहे. मी एक माध्यम आहे. कर्ता करविता तो आहे. सबका मालिक एक. माझे साई माझे गुरुदेव.

        फेब्रुवारी २०१७ मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेतुन एपीआय या पदावरुन मी स्वेछ्चानिवृत्ती घेवुन सातारा शाहुपुरी येथ्रे आलो. पुढे काय हा प्रश्न माझ्याकडे नव्हताच मुळी… कारण मी अध्यात्मात स्वतास झोकुन दिले होते. ते का आणि कसे ? कुठपर्यत हे मलाही माहीत नाही. गुरु म्हणून सध्य कालातील प्रचलीत कोणासही माझ्या मनात स्थान नाही. कारण आपण सर्वजण आजकालच्या भोंदुगिरीना जाणून आहात. आणि श्रीसाईनी सोप्या शब्दात सांगितले आहे जो गुरु मग तो कोणीही असो जो पैसे घेवुन शिष्य करतो आणि दिक्षा देतो. तो आपणास एक प्रकारे भिक्षेस लावतो. पैसे घेतो तो तुम्हास काय सांगणार, देणार. असे कान फुकूंन जो एखादा मंत्र तुम्हास सांगणार त्याने ना त्याचे भले होणार आणि ना तुमचे ही केवळ फसवेगिरी आहे.

म्हणुनच भगवान श्रीशिवशकंर आणि श्रीपाद श्रीवल्लभ आणि जगदजननी आदीमाता आदीशक्ती यांच्या आदेशाने, प्रेरणेने मी अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज देवाधिदेव परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरु साईनाथाना माझे गुरुचे स्थान दिले. आणि हेच विधीलिखीत होते. जर अध्यात्मात खोलात जावुन पाहीले तर हे गुरुशिष्याचे नाते जन्म-जन्मातंरीचे असते. मागील जन्माता राहीलेली तुम्हाआम्हा सर्वाची साधना या जन्मात पुर्ण करुन घेण्यासाठी एक संधी दिली जाते. याचा फायदा घ्यायचा का नाही ते आपले सध्य कर्म ठरवत असते. हा खुप मोठाआणि गहन विषय आहे. परंतु कळाला तर अतिशय सोपा विषय आहे असो.

या दोन वर्षपुर्तीच्या निम्मीताने आपणा सर्वाना माझ्या कडुन हेच मागणे आहे जे प्रेम आपण “श्रीज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी “ला दिलेत ते सारे एवढे मोठे आहे की आपण आज मितीस आपल्या या सहकार्यामुळे वाचकांची संख्या १२,००० हजार ओलांडली आहे हे निश्चीतच गौरवपुर्ण आहे. आपले हे अध्यात्मातील प्रेम असेच असुदया आपल्या जवळील सर्वाना याबाबत सांगून त्यांनाही प्रपंचातुन परमार्थ करण्याचा हा सोपा मार्ग सांगावा. संपुर्ण सोप्या रुपात अशाप्रकारे ही ज्ञानेश्वरी होईल हे मलाही माहीती नव्हते मी यंत्रवत माझे काम करत होतो का आणि कसे हे मी सांगु शकत नाही.

          स्वता भगवंतानी श्रीकृष्ण अवतारात कुरुक्षेत्रात जी गीता अर्जुनास सांगितली ती ७०० श्लोकात आहे, काही काही ठिकाणी ती ७०१ श्लोकात आहे असे उल्लेख आहेत परंतु आपणास या वादात पडायचे नाही आपणास भगवंतानी गीता काय सांगितली ते महत्वाचे आहे.

          हीच गीता पुढे श्रीज्ञानदेवांनी त्यांचे गुरु श्रीनिवृत्तीनाथ जे त्यांचे थोरले भाऊ होते त्यांच्या आदेशाने जनकल्याणासाठी तत्कालीन मराठी भाषेत ९००० हजार ओव्यात सांगितली म्हणजेच ७०० श्लोकांना पुन्हा सोपे करुन सांगितले ते आपणास प्रपंचातुन परमार्थ करता यावा, रोजच्या जीवनात आपणास ते ज्ञान उपयोगी पडावे याकरीता. असो.

         ही तत्कालीन मराठी भाषाही आपणास सर्वाना कळण्यास अवघड जात होती मीही त्यातीलच एक होतो पुढे साईच्या कृपेने जे काही घडले ते आपणा पुढे आहे आणि आपण त्याचा लाभ घेत आहात. हे सारे का घडले ते मी स्वता काहीही सांगू शकत नाही मात्र कोणाचेही काहीतरी अनुकरण करुन असे काही केले म्हणु नका. कारण हे सर्व साईकृपेने झाले आहे. एखादया पांगळयाने मेरु पर्वत चढावा किवां आंधळयाने हत्तीचे हुबेहूब वर्णन करावे. याप्रमाणे आहे मी अध्यात्म आणि देवधर्म, नित्य पुजापाठ, हिंदु धर्मातील आचार-विचार, आपली भारतीय संस्कृती, रुढी, रिती-रिवाज, परंपरा जपणारा आणि मानणारा आहे. किंबहुना हे सर्व आहे म्हणुन आपण सर्व आहोत. हे सारे आपले प्राण आहे.

        देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती म्हणत आपणा सर्वाना पुन्हा विनंती करतो कि आपण ज्याप्रमाणे आतापर्यत या वेबसाईटच्या माध्यामातुन मला अध्यात्माची सेवा करण्याची शक्ती दिलीत तशीच पुढे दयावी. आपल्या अशाच प्रेरणेतुन माझ्याकडुन श्रीसाई कृपेने अध्यात्माची आणखी सेवा होत राहु दे. रामकृष्ण हरी…. ओम साई राम…

साईकृपाभिलाषीत

लेखक- साईभक्त नारायण विठ्ठल देवरुखकर, (ज्योतिष विशारद, एम.ए. इतिहास)