आज दिनांक ९\९\२०२२ रोजी अनंत चतुर्दशीच्या अलभ्य अभिजीत शुभ मुहूर्तावर साईभक्तीच्या अनुभवाने ओत-प्रोत असलेले
” पाठीराखा साई ” या माझ्या वडिलांनी लिहलेल्या त्यांच्या साईभक्तीच्या आलेल्या अनुभवावरील पुस्तकाला ऑनलाईन प्रकाशित करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या पुस्तकामध्ये त्यांना आलेले काही सुंदर व चित्तथरारक अनुभव त्यांनी लिहलेले आहेत. हे पुस्तक ऑनलाइन प्रकाशित झाल्यानंतर आता सर्वांना आपल्या मोबाइल वरती सहज वाचता व अनुभवता येईल. काही वर्षापुर्वी त्यांनी हेच पुस्तक छापील स्वरूपामधे प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या हजार प्रतींचे वाटप जुलै २०२२ मधे शिर्डी इथे द्वारकामाई आणि चावडी परिसरात आम्ही सकुटुंब केले. साईंच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेल्या शिर्डीत साईभक्तांना हे पुस्तक वाटतानाचा आनंद अतिदुर्लभच. आज श्री गणेश अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर ” पाठीराखा साई ” पुस्तक ऑनलाइन प्रकाशित होत आहे. आणि हा दुग्धशर्करेचा योग म्हणावा लागेल. याच पवित्र मुहुर्तावर साईंच्या कृपेने माझ्या वेब-दुनियेतील करियरची सुरुवात करत आहे.
त्यांचा हा अध्यात्मिक प्रवास असाच अखंड सुरु रहावा. त्यांच्यावर श्री साईंचा आशीर्वाद कायम रहावा व कृपादृष्टी रहावी हीच साईंच्या चरणी प्रार्थना. त्यांच्या “पाठीराखा साई” या ऑनलाइन पुस्तकासाठी माझ्या अनेक शुभेच्छा.
मी वेब डिज़ाइनिंग शिकल्यानंतर पहिल्यांदाच अश्या प्रकारचे काम मी करत आहे.या मधून मला खुप काही शिकण्यास मिळाले. मला ही संधी दिली याबद्दल माझ्या वडीलांचे मी आभार मानतो. व मला या पुस्तकाचे ऑनलाइन स्वरुपात रूपांतर करण्यास मिळाले हे मी मोठे भाग्य समजतो. धन्यवाद
|| ॐ साईराम ||
प्रसाद नारायण देवरुखकर
एम. एस्सी . कॉम्प्यूटर सायन्स ( फुल स्टैक डेवलपर )