जे कर्मयोगी बुध्दीला पुढे करुन चित्त देउन कर्म करतात ते नैष्कर्म्य अवस्थेला गेलेल्या मुक्त पुरूषापेक्षाही अधिक मुक्त दिसतात. कारण त्यांच्यामध्ये बुध्दीपासुन देहापर्यत कोठेही मी पणाच्या अहंकाराचे स्मरण नसते म्हणून कर्म करीत असताही ते शुध्द असतात हे अर्जुना! आता या शांतरसाचे बोलणे आपल्या पात्राची कर्यादा सोडून उंचतळुन येत आहे कारण शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेले विचार माझ्याकडून ओलले जात आहेत.ज्याचा इंद्रियांसंबंधीचा पराधीनपणा उत्तम प्रकारे नाहीसा झाला आहे त्यालाच हे अनूभवाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे श्रोते म्हणाले आता हे विषयांतर पुरे करा कथेचा मूळ संबंध सोडू नका कारण श्लोकांच्या संगतीचा भंग होउन जाईल. जे मनाला आकलन करण्यास कठीण आहे बुध्दीने कितीही विचार केला तरी साप्रउत नाही ते तुला भाग्याच्या अनुकूलतेतुळे सांगता आले जे स्वभावत:च शब्दांच्या पलीकडे आहे ते शब्दांमध्ये सापडले तर इतर आणखीन उपाय कशास पाहिजे ?
याकरिता तुम्ही प्रस्तुत कथा सांगावी ही श्रोत्यांची उत्कट अशी इच्छा जाणून निवृत्तिनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुम्ही एवढा वेळ श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद ऐकला आहे पुढे तोच ऐका मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरूषाचे लक्षण सांगतो तरी एकाग्र चित्ताने ऐकावे. (ओवी ६१ ते ७० ) तरी या जगात आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे त्याच्या घरात येउन शांती त्याला वरते यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंटयाला कर्मबंधाने बांधला जातो फलाच्या इच्छेप्रमाणे कर्माचे आचरण करणाऱ्याप्रमाणे तोही सर्व कर्मे करतो परंतु त्या कर्माचा की कर्ता नाही हे जतणून तो त्या कर्माची उपेक्षा करतो तो ज्या मार्गा बघेल.
तेथे सृष्टीतील सत्य-शिव-सुंदरतेचे त्याला दर्शन होउ लागते तो म्हणेल तेथे ब्रम्हज्ञान प्रगट होत असते. तो नवद्वारांच्या देहात राहूनदेखील त्याचे देहाशी तादात्म्य नसते तो सर्व कर्मे करतो परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे तो काहीच करत नाही. सूक्ष्म विचार केला तर तो सर्वेश्वर वस्तुत: काहीच न करणारा आहे परंतु मायेच्या उपाधीचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो असे दिसुन येते सर्वेश्वरास त्रैलोक्याचा कर्ता म्हणावे तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही कारण तो उदासीन असल्यामुळे त्याच्या हाता-पायांस कशाचाही संसर्ग होत नाही.
त्याची स्वरूपस्थिती कधीच मोडत नाही त्याच्या अकर्तेपणालाही कधीही विरोध निर्माण होत नाही. तरीपण तो पंचमहाभूतांचे समुदाय उत्तम प्रकारे निर्माण करतो तो परमात्मा विश्वातील सर्व प्राणिमात्रांना व्यापुन असतो परंतु कधीही कोणाची आसक्ती धरीत नाही हे विश्व उत्पन्न होते आणि नाहीसे होते याची त्याला वार्ताही नसते प्राणिमात्रांकडुन होणारी सर्व पाप-पुण्य ही सर्व त्याच्या जवळ असुनदेखील तो त्यांना जाणत नाही. एवढेव काय तो त्यांचा साक्षीदेखील होउन राहत नाही मग इतर गोष्टी बद्दल काय बोलावे ? (ओवी ७१ ते ८० )
तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लीलाविलास करतो परंतु त्या ईश्वलाचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही हे अर्जुना! तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो जगाचे पालन करतो आणि जगाचा नाश करतो त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते ते केवळ अज्ञान होय हे तु लक्षात ठेव. जेव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते तेव्हा विश्वभ्रमाची काजळी दूर होते असे झाले म्हणजे परमेश्वराचे अकर्तेपण स्वष्टपणे समजु लागते. आता ईश्वर अकर्ता आहे हे जर चित्ताला पटले तर पुर्वीपासुन स्वभावत: तो ईश्वर मीच आहे असा अभेदाचा अनुभव येतो.अशा विवेकाचा उदय ज्याच्या चित्तात होतो त्याला त्रैलोक्यात भेद कसा बरे दिसू शकेल ? तो आपल्या अनुभवाने संपूर्ण जगच मुक्त आहे असे पहातो,
ज्याप्रमाणे पूर्वदिशेच्या राळी सुर्य उदय पावताच प्रकाशाची दिवाळी सुरू होते आणि इतर दिशांतील अंधकार नाहीसा होतो.ज्याच्या बुध्दीचा निश्चय आत्मज्ञानासंबंधी आहे आणि जो आपणास ब्रम्हरूप मानू लागतो तसेच रात्रंदिवस ब्रम्हपरायण होउन आपली ब्रम्हस्थिती पूर्णपणे राखतो असे सर्वव्यापक श्रेष्ठ ज्ञान ज्याच्या हदयाचा शोध करीत आले आहे त्याचप्रमाणे विश्वदेखील ब्रम्हरूप आहे असे जाणतात हे येथे सागंण्यात मोठे नवल ते काय ? परंतु भाग्य जसे कौतुकानेदेखील दारिद्रयाकडे पाहत नाही किवां विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही. (ओवी ८१ ते ९० )
अथवा सुर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किवां अमृत हे कधी कानाने मृत्यूची वार्ता ऐकत नाही, तसे ज्ञानी पुरूष जीवनात कसलाही भेद जाणत नाही. असो आता आणखी एक दृष्टांत सांगतो उष्णता ही कशी असते याचे स्मरण चंद्राला कधी होत नाही त्याप्रमाणे ते आत्मज्ञानी सर्व भुतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाहीत.मग हे चिलट आहे आणि हा हत्ती आहे किवां हा चांडाळ आहे आणि हा ब्राम्हण आहे अथवा हा आपला मुलगा आणि पलिकडचा परका असा भेद कसा बरे राहील ? किवां ही गाय आहे हा कुत्रा आहे अथवा एक थोर आहे.एक नीच आहे असा तरी भेद कसा राहील ? सारांश जागे झालेल्या माणसास स्वप्न कसे बरे पडणार ? आणि अतं:करणात अहंकार असेल तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसणार नाहीत.
म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सम असणारे ते अद्वय ब्रम्ह आपणच आहोत हे समदृष्टीने पुर्ण वर्म होय.ज्यांनी विषयांचा संबंध न सोडता इंद्रियांचे दमन न करता वासनेवाचून निसं:गता भोगली ते लोक रुढीप्रमाणे वागतात,आपल्या उदरनिर्वाहा साठी लौकिक व्यवहार करतात परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्रम्हविषयक जे अज्ञान असेल त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. ज्याप्रमाणे पिशाच्च जगात वावरत असतानाही जगाला दिसत नाही. त्याप्रमाणे समदृष्टी असलेला आत्मज्ञानी असुन देखील जग त्याला ओळखत नाही. हे असो वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरच पाणी लाटारुपाने खेळत असते परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळया आहेत असे म्हणतात. (ओवी ९१ ते १००)
त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले तरी देखील ते साक्षात ब्रम्हरूप आहेत आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत आलेले असते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना! अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते त्या पुरूषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो तरी तु ऐक. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर वाहुन जात नाही त्याप्रमाणे जो प्रिय अथवा अप्रिय गोष्ट झाली असता तिच्या पासुन विकार पावत नाही, श्रीकृष्ण म्हणाले,
हे अर्जुना! तोच खरा समदृष्टीचा पुरूष होय आणि तोच ब्रम्हाशी एकरूप झालेला आहे. तो आत्मस्वरुपाच्या आनंदाला सोडुन कधीही इंद्रियांच्या आधीन होत नाही त्याने विषयांचे सेवन केले नाही सरत आश्चर्य ते कोणते ? आत्मानंदाच्या तृप्तीने त्याचे अतं:करण स्वाभाविकच परिपूर्ण संतुष्ट असते; म्हणून त्याची पाउले विषयसुखांकडे वळत नाहीत.
जो कमलपत्राच्या ताटामध्ये शुध्द शीतल चंद्रकिरणांचे सेवन करतो तो चकोर पक्षी वाळवंटातील वाळुचे खडे चोखीत बसेल काय ? त्याप्रमाणे ज्याला स्वताच आपल्या ठिकाणी आत्मानंद प्राप्त झाला त्याच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो हे काय सांगावयास पाहिजे काय ? येऱ्हवी सहज कौतुकाने थोडा विचार करुन पाहा की या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात ? ज्यांनी आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही ते इंद्रियां कडुन प्राप्त होणाऱ्या विषयांत रंगुन जातात. ज्याप्रमाणे भुक लागलेला दरिद्री मनुष्य कोडां देखील खातो. (ओवी १०१ ते ११० )
किवां तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमामुळे खऱ्या पाण्याला विसरुन जातात आणि मृगजळाला पाणी समजुन माळरानावर धावत येउन पोहोचतात. त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते आणि ज्याला स्वरूप-आनंदाची सदैव कमतरता असते त्यांना हे विषय सुखरुन वाटतात एरवी विषयांमध्ये सुख आहे असे बोलणे देखील योग्य नाही विजेच्या चमकण्याने जगात उजाडत नाही कारण ते चमकणे क्षणिक आहे तसेच विषयही विनाशी आणि क्षणिक आहेत.
सांग बरे वारा, पाउस, उन, यांच्या पासुन रक्षण करण्याचे काम ढगांच्या सावलीने होत असेल तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे का बांधावीत ? विषयांचे स्वरूप न कळाल्यामुळे विषयांत सुख आहे. असे व्यर्थ बोलले जाते म्हणुन का विषाच्या कंदाला मधुर म्हणावे ? भूमिपुत्र हा सर्व ग्रहात दुष्ट असतो तरीपण मंगळ असे म्हणतात किवां मृगजळालाच जल असे म्हणतात त्याप्रमाणे विषयापासुन मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे. हे सर्व बोलणे राहु दे असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होउ शकेल ? जो पर्यत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकडयास मासा तोंड लावीत नाही तोपर्यत तो ठिक असतो.
त्याप्रमाणे सर्व विषयांशी आपला संबंध येत नाही, तोपर्यतच बरे हे पांडवा, तु निसंशय समजुन घे विरक्त पुरूषाच्या दृष्टीने हे विषयसुख जेव्हा पाहिले जाते, तेव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठठपणासारखे वरुन चांगले पण आतुन घातक असे दिसु लागते. म्हणुन सवयीमुळे त्यांना विषयसेवन केल्याशिवाय चालत नाही. (ओवी १११ ते १२०) ते बिचारे अज्ञानी विषयांच्या आतले दुख स्वरुप जाणत नाहीत म्हणुन त्चांच्या हातुन अवश्यही विषसेवन घडत असते.
पुवाच्या चिखलात राहणाऱ्या किडयांना त्या घाणीची कधी किळस येते काय ? त्या दुखी लेाकांचे दुख हेच जीवन बनलेले असते कारण ते विषयरुपी चिखलात राहणारे बेडुक असतात, भोगरुपी पाण्यातील जलचर असतात, तर मग ते विषंयांचे सेवन कसे बरं सोडतील ? जर विषयांच्या ठिकाणी जीवमात्र हे विरक्ती धारण करतील तर मग जेवढया म्हणुन दुखदायक योनी आहेत, तेवढया व्यर्थ होणार नाहीत का ? अथवा गर्भवासात होणारी दुखे जन्म-मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी बरे चालावा ? जर विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर मग महापांतकांनी कोठे बरे राहावे ? आणि मग संसार हा शब्द जगामध्ये खोटा ठरणार नाही का ? म्हणुन जे विषयांच्या भोगापासुन उत्पन्न होणाऱ्या दुखाला मानतात, ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे सर्वाना भासवितात,
म्हणुन हे अर्जुना! या विषयांचा सुख सूक्ष्म विचार केला तर हे विषय फार वार्टट आहेत, असे दिसते म्हणुन तु चुकूनसुध्दा त्या मार्गाला जाउ नकोस. कारण विरक्त पुरूष हे विषयसुखांना विषाप्रमाणे मानुन त्यांचा त्याग करतात. हे निरिच्छ असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूपी दुख त्यांना आवडत नसते. आत्मज्ञानी पुरूषाच्या अतं:करणात, दुखरूप विषयांची गोष्टसुध्दा नसते कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती स्वाधीन केलेल्या असतात. जे बाहय विषयांच्या उपभोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत त्यांच्या अतं:करणात एक ब्रम्हसुखच नांदत असते.(ओवी १२१ ते १३०)