श्रीज्ञानमाऊलींची हदयातुन उस्फुर्त भक्तीउधळण
हरीपाठ
इसवी सनाच्यातेराव्या शतकातील महाराष्ट्र भुमीतील आश्चर्य म्हणजे ज्ञानमाऊली… नियतीचे न सुटणारे कोडे म्हणजे ज्ञानमाऊली आणि त्यांची तीन भावंडे.“एका संन्याशीची मुले” म्हणून त्यांच्या नशीबी जगणे आले. ज्ञानमाऊलीनी अशा उपाधीला आणि तत्कालीन धर्ममार्तडांना न जुमानता आपल्या अध्यात्मातील उस्फुर्त झऱ्याना कधीच आटू दिले नाही. त्यांचा थोरला भाऊ म्हणजे निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. कारण नाथपंथातील श्रीगहीनीनाथांनी त्र्यंबकेश्वर जवळील ब्रम्हगिरी डोंगराच्या गुहेत निवृत्तीनाथांना नाथपथांची दिक्षा दिली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानमाऊलींना याच नाथपंथाची दिक्षा दिली. त्यामुळे एका अर्थाने निवृत्तीनाथ त्यांचे गुरु झाले.
तेराव्या शतकात पैंठण ( सध्याचा औरगांबाद मधील तालुका ) संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान म्हणून ओळखले जाणारे हे शहर तत्कालीन ज्ञानपीठ म्हणून नावारुपाला होते. (हे ज्ञानपीठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी आणि त्यानंतरही मराठयांच्या राजवटीच्या कालावधी आणि त्यानंतरही होते. म्हणजे साधारणत: अठराव्या शतकापर्यत असावे याबाबत जास्त माहीती घेतली नाही.)ज्ञानपीठ पैठणला असल्यामुळे आळंदी येथुन तत्कालीन धर्मपंडीतांनी निवृत्तीनाथांसह ज्ञानदेवांना आणि सोपान, मुक्ताबाई यांना धर्मात घेण्यासाठी आणि वेद-शास्त्राचा अभ्यास करता यावा. म्हणून ज्ञानपीठपैठणला शुध्दीपत्र आणण्यासाठी जाण्यास सांगितले. परंतु या ठिकाणी आईवडील गमावलेल्या या पोरक्या पोरांची तत्कालीन आंधळया धर्म रुढी पुढे आणि तत्कालीन धर्ममार्तडांपुढे काही एक चालली नाही. आपेगावच्या (औरंगाबाद) आणि त्यांच्या आईवडीलांच्या विरहानंतर आळंदीला रहात असलेल्या विठ्ठलपंतानी आणि त्यांची जीवन सहचसारणी धर्म-पत्नीनी आपल्या मुलांच्या वेद-शास्त्र शिक्षणासाठी तसेच त्यांना धर्मात घेण्यासाठी आळंदीच्या तत्कालीन धर्ममार्तडांच्या सांगण्यावरुन आपल्या प्राणाची आहुती इंद्रायणीत दिली.
परंतु आपल्या मुलांना धर्मशिक्षण मिळावे म्हणून जलसमाधी घेतलेल्या एका आई-वडीलांचे ते पवित्र बलिदान तत्कालीन धर्ममार्तडांना दिसलेच नाही. (खरंतर ज्ञानमाऊलीच्या आईवडिलांना एकप्रकारे मारुन टाकल्यानंतर आता कोणत्याही रितीने या चार भावंडाना संपवुन एकप्रकारे सर्व कुटूंब सपंवायचे. म्हणजे पुढे हा वंशच रहाणार नाही आणि औषधावाचुन खरुज जाईल. अशी योजना तत्कालीन धर्म पंडीतांनी आखली असावी. तसेच निवृत्तीनाथ आपल्या भावंडासह पैठण येथे जाण्याअगोदर आपल्या खबऱ्या करवी या कुटूंबाची आळंदीतील इत्यंभूत माहीती आणि पुढे निर्णय काय घ्यायचा हे पत्रातुन आणि खबऱ्या करवी सांगितलेच असावे.) रुढी आणि परंपराच्या अधीन झालेल्या जानवी आणि शेंडीधारकांना या कोवळया मनाच्या मुलांनी आईवडीलांसाठी फोडलेला टाहो ऐकू आलाच नाही. यापेक्षा मोठी हिंसा/हत्या, निष्पाप बळी घेणे अशी मोठी पापे असु शकतील का? तत्कालीन जनता अशा कृत्याचे समर्थन करणारी होती का? किवां तत्कालीन जनतेला या बाबत काहीही माहीती नसावी का ?
धर्मात घेण्यासाठी आणि वेद-शास्त्राचा अभ्यास करण्यासाठीचे शुध्दीपत्र आणण्यासाठी निवृत्तीनाथ आपल्या भावंडासह आळंदीहुन जेव्हा ज्ञानपीठ पैठण येथे आपल्या वडीलांच्या बहीणीकडे म्हणजेच त्यांच्या आत्याच्या घरी पोहचले, आणि पैठण येथे ज्ञानपीठाच्या तत्कालीन धर्ममार्तंडासमोर आपले म्हणणे मांडले. त्यावेळी विचारविनीमय करुन ग्रंथाचा आधार घेत तत्कालीन पीठासीन असणाऱ्या पंडीतांनी निवृत्तीनाथांची ही मागणी धुडकावुन लावली. संन्याश घेतलेल्या मनुष्याने पुन्हा संसार करावा आणि या कालावधीमध्ये त्याच्या उपजत मुलानां धर्माचा अभ्यास करता यावा. किंबहुना त्यांना यासाठी धर्मात घेतले जावे. ही बाब धर्मसंमत नाही आणि या बाबत ग्रंथात कोठेही उल्लेख नसल्याचे दाखले दिले गेले. आणि या चार भांवडाना धर्मात घेवुन त्यांना वेद-शास्त्राचा अभ्यास करता यावा हीमागणी साफ धुडकावुन लावली.चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. त्याप्रमाणे ज्ञानमाऊलींना धर्ममार्तडांची धर्मात घेण्याबाबतची विचीत्र अट मान्य करावी लागली. ती म्हणजे रेडयाच्या तोडूंन वेद म्हणवुन दाखवण्याचीज्ञानमाऊलीनी ती मान्य केली आणि आपले गुरु निवृत्तीनाथांना वंदन करुन रेडयामुखी वेद वदवुन दाखवल्यावर पैठणवासीयांना या बधूंद्वयाच्या ठिकाणी ईश्वरी साक्षात्कार होवु लागले.***(ही बाब काही जाणकारांना आणि शास्त्रकारांना मान्यनाही तरीपरंतु या ठिकाणी आपण हे ग्राहय धरुया कि एखादया वेदशास्त्र न जाणणाऱ्या अशिक्षीत किंवा ज्यांना त्यावेळीच्या धर्मपंडीतानी शास्त्र शिक्षण निषीध्द केले होते. अशा अशिक्षीताकडुन वेद म्हणवुन घेतले असावेत.)या वेळी पैठण वासियांनीया सर्व भावंडाना तेथेच रहाण्यासाठी आग्रह केला. अगदी त्यांच्या आत्यांनीही बरीच विंनती केली. परंतु निवृत्तीनाथांनी आपल्या बंधूद्वयासह पैठण सोडण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वजण पुढील यात्रा करत अहमदनगर जवळील नेवासा या पवित्र पुण्यपावन क्षेत्री आले. आणि या ठिकाणी जणू काही त्यांना कोणीतरी आपलेच आपणाकडे खेचून घेत असल्याचे जाणवले. मायेचा हात अदृश्यपणे त्यांच्या पाठीवरुन प्रेमाने फिरत असल्याचा आभास जाणवला, (नेवासा या ठिकाणी श्रीमोहीनीराजाचे मंदीर आहे. आणि मल्हारी मार्तंड देवांच्या पत्नी श्री सौ.म्हाळसादेवी यांचे हे माहेर आहे.) या पवित्र भूमीत त्यांच्या मनाला एक आत्मीक समाधान मिळाले. आपलेपणाची, मायेची एक अदभुत सरसरी त्यांना स्पर्श करीत असल्याचे त्यांना जाणवले. याच सुप्त ओढीनी चारी भावंडे तेथेच स्थिरावले. आणि ज्ञान माऊलीच्या विश्वकल्याणाच्या पवित्र कार्याला एकप्रकारे येथुनच आरंभ झाला. याठिकाणी श्रीज्ञानमाऊलींचे अध्यात्मातील विश्वाच्या उध्दाराची आंतरीक प्रेरणा जागृत होवू लागली. आणि निवृत्तीनाथांच्या कृपेने ती काही अशीच बोलू लागली बहरु लागली.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटेवरी ठेवूनियां ||
ज्ञानमाऊलींच्या हरीपाठाचे पाठातंर नसेल,असा वारकरी आपणाला शोधावा लागेल तरीही पुर्वापार ज्याला वाचता येत नाही.अशाकितीतरी वारकरी भक्तांनी हा ठेवा फक्त पाठांतराने जपुन ठेवला आहे. आणि हीच पांडुरंगाच्या भक्तीची लाख मोलाची पुरचंडी वृध्द वारकरी पुढील वारकऱ्यास देवुन वारकऱ्यांची पुढील पिढी घडवण्यात एकप्रकारे हातभार लावत असतात. अशा हरीपाठाचे बोली मराठी भाषेत शब्दांकन करुन या हरीपाठाचा गोडवा आम्ही आणखी वाढवत आहोत.ही त्या माऊलींची आणि पांडुरंगाची आणि माझ्या गुरुवर्य श्रीसाईमाऊलीची आणि भगवान श्रीशिवपार्वतीमातेची, श्रीपादश्रीवल्लभस्वामींची आणि माता सरस्वतीची अमोघ कृपाच…ज्यामुळे पांडुरंगाचा जो भक्त हरीपाठ जेवढया आवडीने म्हणतो. तो हरीपाठ त्या भक्ताला सअर्थ कळेल आणि पुर्णत: त्या भक्ताची भक्ती श्रीपांडुरंग चरणी आणखी सदृढ होईल.या हरीपाठाची रचना करताना ज्ञानमाऊलींनी अठ्ठावीस अभंगाची निवड केली आहे एक प्रकारे अठ्ठावीस युगे वीटेवर उभ्या असणाऱ्या विठूमाऊलीनां अठ्ठावीस अंभगाची सोबत करुन दिली आहे आणि याप्रकारे आपले विठूरायांच्या चरणी आपले सर्मपण केले आहे. रामकृष्ण हरी… पांडुरंग हरी… वासुदेव हरी… नारायण हरी…
हरीपाठांचे मराठीत भाषांतर
श्रीज्ञानदेवांच्या हरीपाठातज्ञानमाऊलीनी त्यांचे गुरु श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपार्शिवादाने मनुष्यजन्माचे कल्याण साधण्यासाठी प्रत्येक मनुष्याने भगवंताना पुर्ण शरण जावुन आपल्या जन्माचे कल्याण करुन घ्यावे आणि चारी मुक्ती प्राप्त करुन घ्याव्यात म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातुन हा संसार सागर पार करुन जावू शकता याबाबत बोध केला आहे.यासाठी हरीचे नामस्मरणाचे महत्व विशद करुन सांगितले आहे.नामाचा महिमा आणि हरीचे नामस्मरण किती महत्वाचे आहे हे पटवुन सांगितले आहे. ज्याप्रमाणे गवताला आग लागताच ते जळून जाते त्याप्रमाणे तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा म्हणजे तुमची असंख्य पापे जळून जातील आदी बोध केले आहेत.ते तुम्हा-आम्हा सर्व-सामान्याना भावणारे असेच आहेत,प्रत्येक मराठी माणसांच्या मनावर बिंबणारे असेच आहेत.हरीपाठाचे वाचन करुन पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तगणांनी ही अवीट गोडी चाखावी आणि भक्तीचा गोडवा अनुभवावा. हरीपाठाचे सअर्थ वाचन आपणास अध्यात्माच्या आणखीन जवळ घेवुन जाईल.आपल्या अस्तित्वाची जाण करुन देईल, आपण कोण आहे? आपले या पृथ्वीतलावर जन्म घेण्याचे कारण काय? आदी बाबत आपणास विचार करण्यास भाग पाडेल. आपणा प्रत्येकासआई,वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले, मुली, इतर आप्तेष्ट नातेवाईक, मित्र आहेत प्रत्येकाने ही नाती जपता-जपता आपल्या अध्यात्माच्या ठेव्याला जपावे. आणि प्रपंच नेटका करता-करता परमार्थ साध्य करुन पुढील उत्तम जन्माची पेरणी कशी करता येईल. म्हणजेच कर्तव्य करता करता कर्माशी अनुसंधान कसे बांधायचे. याबाबत हरीपाठातुन आपणास बोध मिळेल.
किबंहुना आपल्या मागील किंवा याजन्मातील आपणाकडून कळत नकळत घडलेली पापे, इतर अशी कृत्ये जी आपल्या रोजच्या जीवनात कर्तव्य करताना आपल्या नकळतघडली आहेत कि ज्याचा आपणास आता पश्चाताप होत आहे. अशा पापकृत्याचे परीमार्जन करण्यासाठी या सृष्टीच्या निर्मात्याची, ईश्वराची भक्ती करुन हरीचे नामस्मरण करुन ती कशी नष्ट करता येतील. किवां त्यांचा प्रभाव कशाप्रकारे सौम्य करता येवू शकतो. या बाबत आत्ममंथन करण्यास हरीपाठाचे वाचन आपणास नक्कीच प्रवृत्त करेल.हरीचे नामस्मरण करुनमनुष्य जन्माचे सार्थक कसे करावेयाबाबत आणि स्वताबाबत विचार करण्यास भाग पाडेल. हरीपाठाचे वाचन करुन मनुष्य नक्कीच स्वताचे आत्ममथंन करुन घेवू शकेल आणि आत्तापर्यतचा काळ आपण व्यर्थच घालवला आता तरी ईश्वराच्या चरणी शरण जावुन स्वताचा उध्दार करुन घेवू आणि या जन्म-मरणाच्या फेऱ्यातुन कायमचे मुक्ती होवूया. असा विचार आपणास करण्याच्या भाग पाडेल. श्रीज्ञानमाऊलींनी हरीनामाचे मर्म शोधुनसर्वसामान्याना एकप्रकारे मोक्षाचे द्वारच उघडून दिले आहे. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. हे आपणास एका वाल्या कोळयाच्या उध्दारावरुनकळून येईल कारण मरामरामरामरामरामरा असे उच्चारण करता करता वाल्याकोळयाने राम राम राम असा जप केला. आणि तो वाल्मीक ऋषी झाला आणि विधीलिखीत असे होते की, त्याच वाल्मीक ऋषीनी प्रभूं रामचंद्राच्या रामायण ग्रथांची रचना केली असा हा नामाचा अगाध महिमा आहे. श्रीपांडुरंग कृपेने आणि श्रीज्ञानमाऊलीच्या आर्शिवादाने असे उस्फुर्त विचार आपल्या मनात यावेत. ज्ञानमाऊलीची आळंदीच्या मंदिरात एकत्रितपणे पंधरा दिवस सेवा करण्याची संधी मला डयुटीच्या अनुषंगाने मिळाली त्यामुळे मी डयुटी आणि मनापासुन माऊलीची मनोभावे सेवा केली आणि फलस्वरुप माऊलीची कृपा पावलो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या अगाध ज्ञानाचे मंदिर हे त्याप्रमाणे ज्ञानमाऊलीनी तत्कालीन समाजव्यवस्थेचे अवलोकन केले असता धर्मकांडापेक्षा समाज कर्मकाडांच्या मागे गेलेला दिसला जो योग्य नव्हता आणि अध्यात्मीकतेला पोषक असा नव्हता त्यामुळे श्रीपांडुरंगाच्या कृपेने माऊलीनी तत्कालीन सर्वसामान्यानां भक्तीमार्गात आणल्या शिवाय ते स्वताचा उध्दार करु शकणार नाहीत त्यामुळे ईश्वरापासुन आणि भगवंतापासुन दुरच ठेवलेल्या सर्वसामान्य समाजाला सांगितले की भगवंत तुमचा आमचा सर्वाचा आहे, त्याची तुम्हाला जमेल तशी निरपेक्ष मनाने निर्मळ भक्ती करा. तो आपल्या हाकेला नक्कीच साद देईल. तो फक्त पंडीताने आणि भटजीने आवहान केल्यावरच येतो असे नाही तर योग्य आणि शुध्द आचरण ठेवल्यावर आणि दुसऱ्याबद्दल चांगला भाव ठेवल्यावर तो तुमचे आवहान तुमची प्रार्थना केल्यावरही येणारच. याबाबतच कितीतरी दाखले ग्रंथात आहेत. ज्याप्रमाणे परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे आपल्या जीवनाचे सोने होवो. ही पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि ज्ञानदेवांची गुरुमाऊली निवृत्तीनाथाच्या, श्रीज्ञानदेवाच्या चरणी प्रार्थना. श्रीसाईबाबांच्या अकरा वचनामध्ये एक वचन आहे. ते आपणास माहीती असेलच. “शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा एैसा कोणी“ पर्यायाने ईश्वराची भक्ती जो भक्त करतो तो चागंले आचरण ठेवुन हा संसार सागर निश्चीतच सहज पार करु शकतो. चारी मुक्तीचा अधिकारी होवू शकतो. श्रीज्ञानमाऊलीनी त्यांच्या पसायदानात सांगितले आहेच.“दुरीतांचे तिमीर जावो | विश्व स्वधर्म सुर्य पाहो | जो जें वाछिलं तो ते लाहो सकळ प्राणिजात||”